Disha Shakti

क्राईम

नेवासा बुद्रुक शिवारात घरासमोरच्या मोकळ्या जागेतून नेवासा पोलिसांनी केली 6 किलो वजनाची गांजाची झाडे जप्त

Spread the love

दिशाशक्ती प्रतिनिधी / वसंत रांधवण : नेवासा बुद्रुक शिवारात घरासमोरच्या मोकळ्या जागेतून नेवासा पोलिसांनी गांजाची 6 किलो वजनाची झाडे जप्त केली असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी सायंकाळी 5 वाजता पोलीस उपनिरीक्षक मनोज अहिरे यांना गुप्त बातमीदाराने माहिती दिली की, सत्तार शौकत इनामदार (रा. नेवासा बुद्रुक) याचे राहते घरासमोर मोकळया जागेत काही गांजाची झाडे आहेत. पोलीस निरीक्षक धनंजय जाधव तसेच उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांना याबाबत माहिती देवून तिथे जावून घराशेजारीच असलेल्या मोकळया जागेची शेतजमीनीची झडती घेतली असता सदर शेतामध्ये सुमारे 4 ते 5 फुट उंचीचे गांजाची झाडे दिसून आले. ते दोन पंचासमक्ष उपटली. एकूण 60 हजार रुपये किमतीची 6 किलो वजनाची ही झाडे पंचासमक्ष जप्त करण्यात आली.

नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि नं 742/2024 एनडीपीएस कायदा कलम 20 (अ), 20 (ब), 8 (सी) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्हयातील आरोपी सत्तार शौकत इनामदार यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. अहिरे हे करित आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनजंय जाधव, उपनिरीक्षक विजय भोंबे, हवालदार श्री. राठोड, कॉन्स्टेबल हरि घायतडक, कॉन्स्टेबल आप्पासाहेब वैद्य, कॉन्स्टेबल वासुदेव डमाळे, चालक कॉन्स्टेबल श्री. भवर यांनी केली. पुढील अधिकचा तपास उपनिरीक्षक मनोज अहिरे हे करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!