श्रीरामपूर प्रतिनिधी / इनायत अत्तार : टाकळीभान टेल टैंकमध्ये कालव्यातून पाणी सोडण्याच्या गेटच्या बाजूला एक अनोळखी बेवारस मृतदेह आढळून आला. श्रीरामपूर वरून येणाऱ्या कालव्याच्या पाण्यात हा मृतदेह वाहत आला. याची माहिती मिळताच टाकळीभान दूरक्षेत्रचे राजेंद्र त्रिभुवन, पोलिस मित्र बाबा सय्यद, रावसाहेब (नाना) वाघुले, कारेगाव येथील ग्रामस्थ यांनी सदर मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. संबंधित व्यक्तीचे वय अंदाजे ५५ ते ६० असून, अंगात लाल रंगाचा टी-शर्ट व निळ्या रंगाचा बर्मुडा परिधान केला आहे.
Leave a reply