दिशाशक्ती चांदवड : राष्ट्रनायक महादेव जानकर साहेब यांच्या आदेशाने तसेच प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते साहेब व माऊली सलगर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यातील चांदवड या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाची विधानसभा नियोजन बैठक पार पडली बैठकीचे अध्यक्ष राज्याचे प्रदेश सचिव प्रल्हाद पाटील प्रमुख मार्गदर्शक राज्य कार्यकारणी सदस्य सय्यदबाबा शेख, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शरद बाचकर,उपाध्यक्ष शशिकांत मतकर, उत्तर महाराष्ट्र युवक उपाध्यक्ष धीरज पाटील,नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ अरुण आव्हाड, नगर जिल्हाध्यक्ष तथा चांडवड विधानसभा निरिक्षक नानासाहेब जुंधारे, नाशिक शहराध्यक्ष विलास पलंगे, आदी प्रमुख उपस्थित होते.
चांदवड विधानसभा ही राष्ट्रीय समाज पक्षाला जिंकायची असून कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे तसेच येणाऱ्या काही दिवसात प्रदेशाध्यक्ष व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या उपस्थित मेळावा घेऊ त्यासाठी प्रत्येकाने आप आपापल्या आघाडीचे प्रत्येक गावामध्ये किमान पाच पदाधिकारी तयार करावे असं निरीक्षक जुंधारे यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित सर्वांचे स्वागत तालुकाध्यक्ष गणेश घुमनर यांनी केले गणेश नाकोडे, दौलत वाघ,पिंटू गाडे, नवनाथ जाधव, सुखदेव वाघ, संतोष वागमोडे, तुषार राजनोर, निलेश वाघमोडे, गोरख हुलनार, प्रशांत ठोंबरे आदि पदाधिकारी उपस्थित होते सूत्रसंचालन डॉ. आव्हाड यांनी केले तर सर्वांचे आभार धीरज पाटील यांनी मानले
Leave a reply