पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : पारनेर तालुक्यातील टाकळीढोकेश्वर येथिल रहिवासी पारनेर चे भूमिपुत्र व दैनिक अक्षराज चे अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी तसेच दिशा शक्ती मिडियाचे विशेष प्रतिनिधी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष वसंत रांधवण यांची राज्यातील अक्षराज मेडिया समुह यांच्यावतीने दिला जाणारा राज्यस्तरीय निर्भिड पत्रकारिता पुरस्कार २०२४ करीता नुकतीच निवड करण्यात आली असल्याचे अक्षराज मेडिया समुहाचे अध्यक्ष व मुख्य संपादक विनोद गोरे व सहसंपादिका प्राजक्ता चव्हाण – गोरे यांनी वसंत भानुदास रांधवण यांना निवडीचे पत्र देऊन कळवीले आहे.
बुधवार दि. १४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता पत्रकार भवन, सदाशिव पेठ, पुणे या ठिकाणी विविध क्षेत्रातील नामवंत लेखक आणि मान्यवरांच्या हस्ते दैनिक अक्षराज वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निर्भिड पत्रकारिता पुरस्कार २०२४ देऊन वसंत रांधवण यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पत्रकारिता क्षेत्रात गेल्या काही वर्षांतील सातत्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल आम्ही अक्षराज मेडिया समुहाकडून वसंत रांधवण यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४ जाहीर करण्यात आला असल्याचे मुख्य संपादक विनोद गोरे यांनी सांगितले आहे.
अक्षराज समाजातील मानबिंदू असलेल्या चिखली,ता. चिखली, जिल्हा बुलढाणा येथुन प्रकाशित होत असलेले भारत सरकार नोंदणीकृत असलेले अक्षराज मीडियाने आपला वेगळा ठसा उमटविला आहे. दरवर्षी पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांना वर्धापन दिनाच्या दिवशी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येते असल्याचे गोरे यांनी सांगितले. हा पुरस्कार जाहीर जाहीर झाल्याबद्दल पारनेर तालुक्यासह जिल्ह्यांतील पत्रकारांनी, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी वसंत रांधवण यांचे अभिनंदन होत आहे.
वसंत रांधवण यांना राज्यस्तरीय निर्भिड पत्रकार पुरस्कार जाहीर, पुणे येथील पत्रकार भवन येथे पुरस्कार सोहळा

0Share
Leave a reply