Disha Shakti

Uncategorized

संगमनेरमधील साकुर येथे लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच नवदाम्पत्याची आत्महत्या

Spread the love

संगमनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : पुण्यात नोकरीला असलेल्या नव दाम्पत्याने संगमनेर तालुक्यातील साकुर या आपल्या मूळ गावी येत गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या दाम्पत्याचे लग्न होऊन अवघे अडीच – तीन महिने झाले होते. झाडाला गळफास घेतलेले त्यांचे मृतदेह आढळून आल्याने हा आत्महत्येचा प्रकार असावा असा पोलिसांचा प्राथमिक कयास आहे. त्यांनी आत्महत्या का केली किंवा इतर काही कारण आहे काय या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. वैभव दत्तात्रय आमले (वय २३ वर्ष) आणि स्नेहा वैभव आमले (वय २० वर्ष) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या नव दाम्पत्याचे नाव असून साकुरच्या मुळा नदीजवळ मांगमळीत रविवारी (११ ऑगस्ट) रात्री काही ग्रामस्थांना त्यांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आले होते.

घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, पोलीस कर्मचारी प्रमोद गाडेकर व सुभाष बोडखे घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेरला पाठविले आहे. उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर मृत्यूच्या नेमक्या कारणांचा उलगडा होईल. अवघ्या दोन-तीन महिन्यांपूर्वी विवाह झालेले हे नव दाम्पत्य पुण्यात नोकरी करत होते. मात्र त्यांनी गावाकडे साकुरला येत रविवारी रात्री आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!