राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील मांजरी येथील तीन दिवसांपूर्वी रविवारी आपल्या शेतात गेल्या होत्या परंतु सदरील महिला घरी न परतल्याने कुटुंबीयांनी सोमवारी राहुरी पोलीस स्टेशन येथे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती व रविवार पासून कुटुंबीय व नातेवाईक सुमनबाई सावळेराम वीटनोर (वयवर्ष ६७) यांचा शोध घेत होते. आज दुपारी सदरील महिलेचा शोध घेत असताना मृतदेह तेथील चोपडे यांच्या शेतात विवस्त्र अवस्थेत आढळून आला आह़े. सदरील महिलेच्या अंगावरील चार तोळे सोनं ओरबाडल्याचे निदर्शनास येत आह़े व महिलेचा चेहरा ओळखू येऊ नये म्हणून चेहरा जाळण्याचा प्रयत्न केला गेला असून दागिने चोरण्याच्या हेतूने हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आह़े. पूर्ण चौकशी नंतरचा घटनेची सत्यता समोर येईल असे पोलिसांनी सांगितले आह़े.
सदरील घटनेची माहिती समजताच राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल होऊन पाहणी करून घटनेची माहिती घेतली व तसेच फॉरेन्सिक लॅब, श्वानपथक व ठसेतज्ञ यांची मदत घेण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास चालू आह़े.
Leave a reply