राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : दि.09/08/2024 रोजी उंबरगांव, ता. श्रीरामपुर जि.अहमदनगर येथील वृध्द महीला हिराबाई म्हसु कलापुरे या नांदगांव शिंगवे ता. जि.अहमदनगर येथुन नातेवाईकांचा दशक्रिया विधी करुन परत श्रीरामपुर येथे जाण्यासाठी राहुरी बस स्थानकामध्ये आल्या असता त्या श्रीरामपुर जाणारे बसमध्ये चढत असताना दुपारी सव्वा एकच्या सुमारास दोन अनोळखी महीलांनी व एका अनोळखी पुरुषाने त्यांचे गळ्याला चाकु लावुन त्यांच्या गळ्यातील 1 तोळा वजनाचे सोन्याचे मणी असलेली पोत जबरीने चोरुन नेली. त्याबाबत हिराबाई म्हसु कलापुरे यांनी दिनांक 09/08/2024 रोजी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन दोन अनोळखी महीला व एक अनोळखी पुरुष यांचेविरुध्द बी.एन.स 2023 चे कलम 307, 309(4), 112(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. संजय ठेंगे यांनी सदर गुन्ह्यातीला आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगाने तपासाचे चक्रे फिरवुन आरोपीच्या शोधासाठी एक पथक रवाना केले व सदर पथकाने सदर चोरट्यांपैकी दोन महीला नामे (1) रेखा कान्हु गायकवाड वय 41 वर्षे रा. रस्तापुर चांदा ता.नेवासा जि.अहमदनगर (2) लता बाबु रोकडे वय 50 वर्षे रा. संजय नगर श्रीरामपुर ता. श्रीरामपुर जि.अहमदनगर यांना गुन्हा करुन राहुरी येथुन पळुन जाण्याच्या आत त्यांचा शोध घेवुन त्यांना दिनांक 09/08/2024 रोजी तत्काळ अटक करुन त्यांच्याकडे विचारपुस केली असता त्या दोघींनी तसेच त्यांचा साथीदार (3) प्रभु उर्फ काळु अशोक लोंढे रा. चितळी ता. राहता जि.अहमदगनर हल्ली रा. संजयनगर श्रीरामपुर ता.श्रीरामपुर जि.अहमदनगर आशांनी मिळुन सदरचा गुन्हा केला असल्याचे कबुल केले व सदर गुन्ह्यातील चोरीचा माल प्रभू उर्फ काळू लोंढे हा घेऊन पसार झाला असल्याचे सांगितले.
त्यावरुन राहुरी पोलीसांचे पथकाने तातडीने सदर आरोपी प्रभु उर्फ काळु अशोक लोंढे याचा श्रीरामपुर येथे शोध घेवुन त्यास श्रीरामपुर येथुन 09/08/2024 रोजी रात्री अटक केली व त्याचेकडे सदर गुन्ह्याचे अनुशंगाने तपास केला असता त्याने सदर गुन्ह्यातील चोरी केलेली सोन्याचे मणी असलेली पोत श्रीरामपुर येथील सराफी दुकान व्यवसायिक विमल ज्वेलर्स चे मालक गणेश सुभाष दहिवाळ रा. गोंदवणी रोड श्रीरामपुर ता. श्रीरामपुर जि.अहमदनगर याला विक्री केल्याचे सांगितले.
त्यावरुन पोलीसांनी सदर सराफ व्यवसायिक गणेश सुभाष दहिवाळ याचेकडे तपास केला असता त्याने सदर गुन्ह्यातील चोरीचे सोने विकत घेतल्याचे कबुल करुन सदर चोरीच्या मण्याचे त्याने वितळवुन पाणी केले असल्याचे कबुल केल्याने त्यास गुन्ह्यात दिनांक 10/08/2024 रोजी अटक करुन तीन आरोपींची चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्यांचेकडुन चोरीचे 10 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड व सदर सोने वितळवण्यासाठी लागणारे साहीत्य व साधने पोलीसांनी सराफ व्यवसायिक गणेश सुभाष दहिवाळ याचेकडुन जप्त केली आहे.तसेच आरोपी प्रभु उर्फ काळु अशोक लोंढे हा राहत असलेल्या घरातुन पोलीसांनी त्याने गुन्ह्यात वापरलेला चाकु हस्तगत केला आहे. सदर आरोपींनी यापुर्वीही राहुरी बस स्थानक परिसरात चोऱ्या केल्याबाबत 4 गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक साहेब अहमदनगर श्री. राकेश ओला, मा.अप्पर पोलीस अधिक्षक साहेब श्रीरामपुर श्री.वैभव कलुबर्मे, मा.उप.वि.पोलीस अधिकारी साहेब डॉ.बसवराज शिवपुजे, मा.पोलीस निरीक्षक साहेब राहुरी पो.स्टे श्री.संजय ठेंगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास वैराळ, संदीप ठाणगे, बाबासाहेब शेळके, सुरज गायकवाड, राहुल यादव, प्रविण बागुल, गोवर्धन कदम, प्रमोद ढाकणे, सतिष कुऱ्हाडे, जयदीप बडे, राधिका कोहकडे, मीना नाचण चालक शकूर सय्यद, जालिंदर साखरे यांनी केली असुन पुढील तपास हेड कॉन्स्टेबल विकास वैराळ हे करत आहेत.
राहुरी बस स्थानकामध्ये महीलांच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावुन जबरी चोरी करणारी टोळी राहुरी पोलीसांकडुन जेरबंद

0Share
Leave a reply