पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी शासन काम करत आहे. या योजनेच्या माध्यमातून पारनेर तालुक्यातील महिलांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील पोखरी, देसवडे, खडकवाडी, पळशी, वनकुटे, वडगाव सावताळ, तीखोल, धोत्रे, ढोकी, वासुंदे, कर्जुले हर्या, सावरगाव, पळसपुर या भागातून मोठ्या प्रमाणात महिला बँक अकाउंट आधार लिंक व्हेरिफिकेशन साठी स्टेट बँकेमध्ये येत आहेत.
टाकळी ढोकेश्वर शाखेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली त्यामुळे परिसरातील महिलांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना समितीचे पारनेर तालुका सदस्य युवा सेना तालुकाप्रमुख सुभाष सासवडे व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी रोकडे, शिवसेना युवा सेना टाकळी ढोकेश्वर विभाग प्रमुख अक्षय गोरडे यांनी टाकळी ढोकेश्वर येथील स्टेट बँकेचे शाखा अधिकारी यांना भेटून येणाऱ्या समस्या संदर्भात माहिती जाणून घेतली व महिलांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी योजनेचे सदस्य सुभाष सासवडे यांनी पूर्णतः प्रयत्न करणार आहे. त्यासाठी आमची टीम कार्यरत असून या पुढील काळात योजनेची महिलांना तात्काळ सेवा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे महसूल मंत्री अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना समितीचे पारनेर तालुका अध्यक्ष सुनील थोरात यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना पारनेर तालुक्यात सक्षमपणे राबवली जात आहे या योजनेच्या माध्यमातून पारनेर तालुक्यातील ९ हजारापेक्षा जास्त महिलांना बँक अकाउंट वर पैसे सुद्धा जमा झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे लाडकी बहीण योजना समितीचे सदस्य सुभाष सासवडे यांनी सांगितले
लाडक्या बहिणींची टाकळी ढोकेश्वर बँकेत गर्दी ; सुभाष सासवडे यांनी घेतली शाखाधिकारी यांची भेट

0Share
Leave a reply