दिशाशक्ती अकोले / गंगासागर पोकळे : सन २०१२ दिल्ली येथील निर्भया रेप आणि मर्डर केसने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती त्या आरोपिंना कुठे शिक्षा होते न होते तोच संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला हदरून टाकणारी सन २०१६ तील कोपर्डीच्या ताईवर झालेल्या अत्याचारातील रेप आणि मर्डर केस,आणि आत्ताच कोलकत्ता येथील आपल्या डॉक्टर भगिणीवरील अत्याचार या सर्व घाटनांनमध्ये लाखोंचे मोर्चे निघाले,कँडल मार्च काढण्यात आले नक्कीच यापासून सामाज जागृत होऊन आरोपी पकडण्यास मदत झाली पुढे पोलीस,केस,कोर्ट,तारीख सुरु झाल्या काही आरोपिंना फाशी झाली तर कोपर्डी सारख्या घटनेतील मुख्य आरोपीने तर कारागृहातच ७ वर्षांनी फाशी घेत आत्महत्या केली मग मला प्रश्न पडतो की या प्रकारच्या गुन्ह्यांसाठी एव्हडीशी शिक्षा पुरी आहे का?जर गुन्हा अत्याचारीत, अक्षम्य असेल शब्दात न मांडण्यासारखा असेल तर शिक्षा देखील तितकीच भयानक असली पाहिजे जेणेकरून पुढील गुन्हा करणाऱ्या गुन्हेगाराने दहा वेळेस विचार केला पाहिजे,पण तसं घडत नाही आपल्या देशात गुन्हेगाराला कारागृहात बिर्याणी दिली जाते त्याचे लाड पुरवले जातात राजकीय आरोप प्रत्यरोप होत राहतात
परंतु पुनः असा गुन्हा घडूच नये यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही मग माझ्यासारख्याला आठवण होते ती “चैरंग” शिक्षेची होय अखंड भारताचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकाळात बलात्काराचा गुन्हा सिद्ध होताच पुढच्याच क्षणी गुन्हेगाराचा चौरंग केला जायचा,चौरंग म्हणजेच गुन्हेगाराचे दोन्ही पाय आणि हात कलम केले जाई जेणेकरून हे कृत्य करण्यास कोणी धजावणार नाही,कायद्याचा धाक निर्माण होईल.
महाराजांनी पर स्त्री मातेसमान ची शिकवण दिली खरी पण आज याच आमच्या माता भगिणी सुरक्षित नसतील तर महाराजांच्या शिकवणीचा कुठे तरी विसर पडताना दिसत आहे.२०१२ दिल्ली,२०१६ कोपर्डी,२०२४ कोलकाता आता आपल्या घरात येण्याची वाट पाहताय का?आजच घराच्या बाहेर पडा आणि कोलकाता येथील भगिणीला योग्य न्याय देण्यासाठी एकजूट होऊया. म्हणून दरवेळेस अन्याय झाल्यानंतर मेणबत्त्या पेटवण्यापेक्षा, अन्याय करणाऱ्याला भर चौकात पेटवा..!!, अशी भावना अकोले तालुक्यातील मातोश्री शांताई देशमुख सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष तात्यासाहेब अशोकराव देशमुख यांनी व्यक्त केली.
Leave a reply