- इंदापूर प्रतिनिधी / प्रवीण वाघमोडे : शनिवार दिनांक १७ ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी झालेल्या पावसाने राजमाता अहिल्यादेवी चौक मदनवाडी या ठिकाणी नवीन काँक्रीट रोडचे काम झालेले असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले या रोडचे काम चालू असतानाच स्थानिकांनी बऱ्याच ठिकाणी बोगस काम होत असल्याबाबत कॉन्ट्रॅक्टदार व कर्मचाऱ्यांना पूर्वसूचना देऊन निदर्शनास आणून दिले होते पण कॉन्ट्रॅक्टदार कर्मचारी व वरिष्ठ अधिकारी यांनी दखल न घेता आहे तसेच कुणालाही न जुमानता काम करून घेतले. काल झालेल्या पावसाने रस्त्याचे कामाचा दर्जा चव्हाट्यावर आणला असून निसर्गाने हे काम कसे चूक आहे हे दाखवून दिले
या चौकातील काम झाल्यानंतरचा हा पहिलाच पाऊस होता या ठिकाणी एका साईडला पूर्णपणे पाणी साचले आहे रस्ताचे काम करताना रस्त्याची लेवल व पाणी साचू नये यासाठी कोणतीच उपाययोजना केलेली दिसून येत नसून या पाण्यातूनच प्रवासांना रस्ता शोधत प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यामुळे यात काही अपघात घडल्यास त्यास जबाबदार कोण हे कॉन्ट्रॅक्टदार व वरील अधिकाऱ्यांनी जाहीर करावे का यात जीवित हानी होण्याची वाट बघणार आहेत. सदर ठिकाणच्या रस्त्याची दुरुस्ती करून प्रशासनाने योग्य दखल घ्यावी अशी मागणी स्थानिक प्रवाशांनी केली आहे.
भिगवण बारामती रस्त्याचे काँक्रेट काम निकृष्ठ दर्जाचे ; पहिल्याच पावसात रस्त्यावर पाण्याचा खच

0Share
Leave a reply