राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथील स्मशान भूमी तसेच महादेव मंदिर परिसर तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाडे लावून तसेच प्रत्येक विद्यार्थ्यास एक मुल एक झाड असा सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणारे वृक्षप्रेमी गिरीकर्णिका फौंडेशनचे किशोर पवार व सुरेंद्र राठोड यांना 15 ऑगस्ट रोजी स्वांतत्र्य दिनाचे औचित्य साधून दिशाशक्ती मीडिया समूह व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्यावतीने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांना ट्रॉफी, मेडल प्रदान करण्यात आले.
वृक्षप्रेमी किशोर पवार व सुरेंद्र राठोड व गिरीकर्णिका फौंडेशनच्या माध्यमातून गावोगावी जाऊन विविध शाळा महाविद्यालयात जाऊन वृक्ष लागवडीबाबत जनजागृती करून मोठ्या प्रमाणात वृक्ष वाटप करून वृक्षलागवडीचे महत्व ते आपल्या फौंडेशनच्या माध्यमातून सांगत असतात याच त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते मधुकर साळवे हे होते तर कार्यक्रमासाठी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हा सचिव राजेंद्र म्हसे, राहुरी तालुका अध्यक्ष अशोक मंडलिक, सचिव आर.आर.जाधव, सह संघटक रमेश खेमनर, सदस्य प्रमोद डफळ व नाना जोशी, उमेश बाचकर व BPS न्यूजचे पत्रकार कृष्णा गायकवाड, जय बाबाचे पत्रकार मनोज हासे, राहुरी फोटोग्राफर संघटना अध्यक्ष जालिंदर गडधे, अंकुश दवणे, सचिन सोळसे, किरण खेमनर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब दाभाडे, प्रहारचे दत्तात्रय खेमनर, मुकींदा शिंदे हे होते.
या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्यध्यापीका जपकर मॅडम, कल्हापुरे मॅडम, निमसे मॅडम, कमळापूर मॅडम, मोरे मॅडम, साळवे मॅडम, कांबळे मॅडम व दुधाडे मॅडम या महिला शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच या वृक्षप्रेमींनी शाळेस झाडे वाटप केल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.
सामाजिक कार्याबद्दल गिरीकर्णिका फौंडेशनचे किशोर पवार व सुरेंद्र राठोड गोटुंबे आखाडा येथे सन्मानित

0Share
Leave a reply