बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार कासराळीकर : बीलोली तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा न मिळाल्यामुळे शेतकरी संकटात असून याकडे शासनाने लक्ष द्यावेअशी मागणी होत आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे शेतातील पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई दिली जाते.
गावामध्ये पीक विम्याचा लाभ 25% शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे 75% शेतकरी वंचित आहे या संदर्भात कृषी कार्यालय येथे कृषी अधिकारी शशिकांत तिडके यांच्याशी रोजगार हमी योजनेचे माजी तालुकाध्यक्ष डॉ.खाकय्या अप्पा स्वामी कासराळीकर यांनी भेट घेऊन शेतकऱ्यांना लवकरात लवकर विमा कसे मिळता येईल या संदर्भात चर्चा केली यावेळी सामाजिक कार्यकर्ते सय्यद रियाज,कृषी कार्यालयातील महेश कुरुंद, नितीन कुरनुले कर्मचारी उपस्थित होते.
Leave a reply