राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथील महादेव मंदिर येथे तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी महादेव मंदिर येथे भव्य भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या भंडाऱ्याच्या माध्यमातून हजारो ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या महाप्रसादाचे आयोजन गावातील ग्रामस्थ माजी उप सरपंच उमेश बाचकर, जालिंदर गडधे (काका), चंद्रक्रांत सुसे यांच्यावतीने भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच या कार्यक्रमास मंडपाचे सहकार्य बिलाल भाई शेख यांनी केले होते. तसेच गावातील अनेक महिला पुरुष व लहान बालकांनी सायंकाळी महादेव मंदिर येथे हरिपाठ घेतला हरिपाठ समाप्त झाल्यानंतर सायंकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. या भंडाऱ्यास राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शरद बाचकर, जिल्हा मत्स्य आयुक्त रमेश धडील, कार्तिक बाचकर, सौरभ गडधे, सामाजिक कार्यकर्ते मतकर , सतीश फुलसौंदर, माजी उपसरपंच उमेश बाचकर, जालिंदर गडधे (काका), चंद्रक्रांत सुसे, बिलाल भाई शेख, दत्तात्रय खेमनर, मुकींदा शिंदे, कार्तिक बाचकर, सौरभ गडधे,
सह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमास गावातील तरुण मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले.
तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त महादेव मंदिर गोटुंबे आखाडा येथे ग्रामस्थांनी केले अन्नदान

0Share
Leave a reply