Disha Shakti

क्राईम

राहुरीतील शनिशिंगणापूर रस्त्यावर मारहाणीत सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू, एक महिला व एक तरुण पोलिसांच्या ताब्यात

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील शनिशिंगणापूर फाटा येथे काल 22 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान एका ६८ वर्षीय सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यास मायलेकाकडून मारहाण केली असता या मारहाणीत त्या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आह़े. या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आह़े. शनिशिंगणापूर फाटा येथे दि. २२ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी तीन वाजे दरम्यान एक महिला व एक तरुण सुखदेव किसनराव गर्जे, वय ६८ वर्ष, ता.अकोले जिल्हा अहमदनगर या सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण करीत होते. त्या तरुणा सोबत असलेल्या हेल्मेटने सुखदेव गर्जे यांना मारहाण केल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिली आह़े. मारहाणी दरम्यान सुखदेव गर्जे हे खाली पडले आणि जागेवर गतप्राण झाले. त्यांना तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना उपचारा पुर्वीच मयत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बाबासाहेब शेळके, प्रवीण बागुल, सुरज गायकवाड, प्रमोद ढाकणे, आजिनाथ पाखरे, राजेंद्र नागरगोजे, महिला पोलिस कर्मचारी कुसळकर आदि पोलिस पथकाने ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर घटनेची माहिती घेतली पोलिस पथकाने ताबडतोब एक महिला व तीच्या सोबत असलेल्या तरुणास ताब्यात घेतले. वैभव विष्णू फुंदे, वय २४ वर्षे व सावित्री विष्णू फुंदे, रा. विद्यापीठ, मुळ रा. पाथर्डी, असे ताब्यात घेतलेल्या तरुण व महिलेचे नाव असल्याचे समजले आह़े. सुखदेव गर्जे यांचा मृत्यू मारहाण केल्यामुळे झाला कि इतर कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास राहुरी पोलिस पथकाकडून सुरु आहे.मात्र सदर घटना ही प्रेम प्रकरणातून झाल्याची परिसरात चर्चा सुरु आहे.

सायंकाळी उशिरा घटनास्थळी नगरच्या लॅब पथकाकडून व राहुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, पोलीस उप निरीक्षक चारूदत्त खोंडे , पोलीस उपनिरीक्षक बोडखे, पो/ कॉ जालिंदर धायगुडे यांच्यामार्फत रात्री उशिरापर्यंत सरकारी पंचांसमक्ष पंचनामा करून घटनास्थळचे नमुने घेण्यात आले. सुखदेव गर्जे यांचा मृत्यू मारहाण केल्यामुळे झाला की इतर कोणत्या कारणामुळे याचा तपास राहुरी पोलिस पथकाकडून सुरु आहे. राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गर्जे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नगर येथील जिल्हा रूग्णालयात पाठवला आहे. अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!