Disha Shakti

सामाजिक

कोल्हेबोरगाव येथें साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त शालेय साहित्याचे वाटप

Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी / मिलिंद बच्छाव : दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी मौजे कोल्हेबोरगाव तालुका बिलोली येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती साजरी करण्यात आली याकार्यक्रमाचे अध्यक्ष मा. माधवराव पाटील गोपछडे प्रमुख वक्ते मा. कॉमब्रेड देवराव आईलवार (सामाजिक कार्यकर्ते) प्रमुख वक्ते मा. रामचंद्र भारांडे (संस्थापक अध्यक्ष लोकस्वराज्य आंदोलन) तर प्रमूख पाहुणे म्हणून मा. इंजी. गोविंददादा हानवटे (संस्थापक अध्यक्ष स्वराज युथ फाऊंडेशन नांदेड) प्रमूख पाहूणे मा. लक्ष्मणराव ठक्करवाड (जिल्हा परिषद सदस्य, नांदेड) विशेष उपस्थिस्ती मीना आरसे ( SFI. जिल्हा सचिव) तर ध्वजारोहण गावाचे सरपंच मा. संजय मारोती मुंडकरयांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सुरुवात महामानवाच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते कॉमब्रेड देवराव आईंलवार यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर व जीवनामध्ये संघर्ष कसा करावा यावर सखोल मार्गदर्शन केले त्यानंतर कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख वक्ते लोक स्वराज्य आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय रामचंद्र भरांडे यांनी शिक्षणाने माणसाची प्रगती कशी होते यावर सखोल मार्गदर्शन केले व वर्गीकरणाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल यावर सुद्धा सखोल मार्गदर्शन केले त्यानंतर स्वराज युथ फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा.गोविंद दादा हनवटे यांनी शिक्षणामुळे माणसाची प्रगती कशी होते यावर गावातील विद्यार्थ्यांच्या पालकांना व मातांना असा संदेश दिला व गावातील व अभ्यासात हुशार पण आर्थिक दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याचं आवाहन केले त्यानंतर कार्यक्रमाला विशेष उपस्थिती असलेल्या स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया चे जिल्हा सचिव मीना आरसे यांनी चळवळीमुळे माणसाची प्रगती कशी होते यावर गावातील तरुण व तरुणींना नवीन सखोल मार्गदर्शन केले .

यावेळी जयंती मंडळाचे पदाधिकारी तसेच गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रमुख मान्यवर तसेच इतर नागरिक व तरुण उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!