Disha Shakti

राजकीय

छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या काळातील कायदे आणण्याची गरज – तिलक डुंगरवाल

Spread the love

श्रीरामपूर प्रतिनिधी /  जितू शिंदे  : श्रीरामपूर -कोलकाता इथं डॉक्टर तरुणीवरील बलात्कार आणि हत्याप्रकरणानं देश हादरला, ही घटना ताजी असतानाच दुसरीकडे बदलापूर शहरातील एका शाळेच्या शिशू वर्गातील दोन विद्यार्थिनींवर शाळेतील कर्मचाऱ्यानं अत्याचार केल्याची घटना समोर आली. संतापजनक अशा या घटनेनं महाराष्ट्र हादरला आहे. शाळेत गेलेल्या चिमुकल्या लेकींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ हजारो लोक रस्त्यावर उतरले. या प्रकरणातल्या आरोपीला कठोर शिक्षा व्हायला हवी, अशी मागणीचे निवेदन आम आदमी पार्टीच्या वतीने तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आले

यावेळी तिलक डुंगरवाल म्हणाले की कोलकाता इथं डॉक्टर तरुणीवरील बलात्कार ही घटना ताजी असताना बदलापूर येथील दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आला अशा अनेक घटना भारतासह महाराष्ट्रामध्ये घडत आहे या घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहे, शाळा ही मुलांसाठी स्वत:च्या घरा इतकीच सुरक्षित अशी जागा असायला हवी. या प्रकरणात या नराधमाला, राक्षसाला कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या काळात दोषींना ज्या प्रकारे शिक्षा द्यायचे, चौरंग – हेच कायदे आपल्याला पुन्हा आणण्याची गरज आहे.’म्हणजे यापुढे कोणाचीही हिंमत होणार नाही,

विकास डेंगळे म्हणाले की एक पालक म्हणून मी खूप दुखावलोय,आणि प्रचंड संताप होतोय.अत्यंत लाजिरवाणी ही घटना आहे आरोपींना खडक शासन व्हावा याकरता ही केस फास्ट ट्रॅक वर चालू आरोपीला आता फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच शैक्षणिक शाळांमधील विद्यार्थी सुरक्षित राहण्यासाठी योग्य ते कायदे करून अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला यावेळी आपचे मा उत्तर महाराष्ट्र प्रचारक तिलक डुंगरवारल, तालुका अध्यक्ष विकास डेंगळे, भैरव शेठ मोरे, मनोज गाडे, भरत डेंगळे, संदेश बोर्डे, राहुल रणपिसे, प्रशांत बागुल, डॉ प्रवीण राठोड, श्रीराम दळवी, अभिजीत राऊत, विवेक साबळे, दिनेश यादव,जयेश कांदळकर, प्रदीप उंडे, आदी उपस्थित होते


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!