अकोले प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : अगस्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तसेच अगस्ती कारखान्याचे जेष्ठ संचालक अशोकराव भाऊसाहेब देशमूख यांचे जेष्ठ बंधू व उंचखडक बुद्रुक ग्रामपंचायतचे उपसरपंच तसेच बुवासाहेब नवले मल्टिस्टेटचे संचालक महिपाल प्रल्हाद देशमूख(बबनभाऊ) यांचे वडील कै. प्रल्हाद भाऊसाहेब देशमूख(दादा) यांचे काल सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी उंचखडक बुद्रुक येथे प्रवरातीरी काल शनिवारी दि.२४-०८-२०२४ करण्यात आला. त्यांच्या पच्छात चार भाऊ, दोन मुलं आणि दोन मुली,पुतणे, पुतण्या असा मोठा परिवार आहे.एक बंधू अशोकराव देशमुख यांनी समाजकारण – राजकारण करत नगर जिल्ह्यात चांगले नाव कमावले आहे, शरद देशमूख हे सेवानिवृत्त शिक्षक,भारत देशमुख हे अगस्ती कारखान्यावर सेवानिवृत्त स्थापत्य अभियंता आहेत तर सगळ्यात छोटे बंधू नंदकुमार देशमुख हे कल्याण कृषी उत्पन्न बाजर समितीचे उपभियंता तसेच नूतन शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आहेत.मोठा मुलगा महिपाल देशमुख समाजकारण करत एक प्रतिष्टीत उद्योजक तर लहान मुलगा शाम देशमुख हे शेती करतात, मोठी मुलगी मधुबाला संजय जोंधळे ही निमगावजांळी येथे दिली आहे तर लहान मुलगी शैला अशोकराव देशमुख ही धंदारफळ येथे दिली आहेत असा मोठा परिवार यांच्या पाठीमागे आहेत.दशक्रियाविधी हा सोमवार दि.०२ सप्टेंबर २०२४ रोजी उंचखडक बुद्रुक येथे प्रवरातीरी श्री क्षेत्र राममाळ येथील पाणवठ्यावर होणार आहे.
Leave a reply