नायगाव प्रतिनिधी / साजीद बागवान : राज्यातील लाडक्या लेकींच्या सुरक्षेकडे इव्हेंटबाज महायुती सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काॅग्रेस च्या वतीने नायगाव च्या तहसीलदार यांना निवेदन देत काळ्या फिती लावून मूक आंदोलन करण्यात आले. राज्यातील महिलांवर होणाऱ्या छेडछाड, ईव्ह टीजिंग, आणि इतर हिंसक घटनांमुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः विद्यार्थीनी, कामकाज करणाऱ्या महिला आणि गृहिणी या सर्वांमध्ये रात्रीच्या वेळी प्रवास करताना असुरक्षितता जाणवू लागली आहे.
या परिस्थितीमुळे त्यांचे दैनंदिन जीवनच नाही तर शहराच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात त्यांचा सहभाग कमी होत असुन या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज पर्यंत महायुती सरकारने कोणतीही ठोस निर्णय घेऊन कारवाई केलेली नाही त्यामुळे महायुती सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काॅग्रेस च्या वतीने शनिवारी नायगाव तहसीलदार यांना निवेदन देत काळ्या फिती लावून मूक आंदोलन करण्यात आले.
यावेळी माणिक पा. चव्हाण तालुका अध्यक्ष युवक काँग्रेस नायगाव, संजय पा. चव्हाण नगराध्यक्ष प्र, नारायण पाटील जाधव मा नगराध्यक्ष प्र शरद भालेराव माजी नगराध्यक्ष व नगरसेवक, विठ्ठल बेळगे नगरसेवक, साईनाथ चनावार काँग्रेस ओबीसी सेल शहराध्यक्ष, बंटी पाटील शिंदे शहराध्यक्ष युवक काँग्रेस नायगाव अभिजीत मंगरूळ शहराध्यक्ष विद्यार्थी काँग्रेस अजिंक्य पा. कल्याण, नारायण पा. जाधव, शाम शिंदे शिवराज पा चव्हाण यांच्या सह आदींची उपस्थिती होती.
Leave a reply