श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी / इनायत आतार : आपतकालीन – पुरस्थिती, शिवार वाहतुकीचे रस्ते खुले करणे, शेतकऱ्यांसह, विधवा – परितक्त्या, वृद्ध महिलांचे डोल आदी काम तलाठी अविनाश तेलतुंबडे यांनी अतिशय प्रामाणिकपणे करत परिसरातून एकही तक्रार न आलेले तलाठी म्हणून उत्कृष्ट काम केल्याने तसेच शनिवार, रविवार आणि रात्री ८ ते ९ ही वेळ न पाहता काम केल्याने जेष्ठ सेवानिवृत्त कोतवाल हाजी नुराभाई अत्तार यांच्यासारख्या ३० वर्ष महसुलमध्ये सेवा केलेल्या जेष्ठ व्यक्तीने अविनाश तेलतुंबडे असा तलाठी माझ्याकाळात आठवत नाही आणि तलाठी होणे नव्हे, असे गौरवोउदगार हाजी नुराभाई अत्तार यांनी काढणे हे सर्वोच्च पुरस्कारापेक्षा कमी नाही असे गौरवोदगार श्रीरामपूर तालुका पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदिप जगताप ग्राम महसुल अधिकारी ( तलाठी ) अविनाश तेलतुंबडे यांच्या निरोप प्रसंगी व्यक्त केले.
श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथे कार्यरत असणारे कामगार तलाठी अविनाश तेलतुंबडे यांनी सुमारे ६ वर्ष नाऊर, रामपूर, जाफराबाद या तीन गावाची सजा असलेल्या नाऊर येथे उत्कृष्ट काम केल्याने परिसराच्या वतीने त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी तलाठी AJ. तेलतुंबडे यांच्यासह ग्रामस्थांना देखील अश्रू अनावर झाले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. नंदा अहिरे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून रामपूरचे सरपंच सुरेश भडांगे, पं. स. सदस्य विजय शिंदे, माजी सरपंच सोन्याबापू शिंदे, प्रतापराव देसाई, संभाजी शिंदे, सेवानिवृत्त शिक्षक सोन्याबापू शिंदे, गोकुळ देसाई, सुरेश देसाई, उपसरपंच दिगंबर शिंदे, माजी उपसरपंच ग्रा.प. सदस्य,हाजी मुसाभाई पटेल, संतोष वाघचौरे, भानुदास भवार, प्रताप शिंदे, बाळासाहेब देसाई, राजेंद्र वाघचौरे, डॉ. एम. जे. साबणे , महसुल सहकारी चंद्रकात गहिरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी उपसरपंच दिगंबर शिंदे म्हणाले,गेल्या ६ वर्षामध्ये कामगार तलाठी अविनाश तेलतुंबडे यांनी पुर परिस्थिती मध्ये पुरग्रस्त शेतकऱ्याचे चिखलात जावून बांधावर पंचनामे केले. जुना वैजापूर रस्त्यासह, नाऊर – जाफराबाद या शिवरस्ताचे कामे तसेच महसुल अंतर्गंत सर्व योजना प्रभावीपणे राबविल्याने त्यांना उकृष्ट तलाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या चांगल्या कामाची ही पावती असल्याचे गौरवोदगार काढले.
माजी सरपंच सोन्याबापू शिंदे म्हणाले संस्कारशिल कुंटुंबातील कामगार तलाठी काय असतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे तेलतुंबडे भाऊसाहेब असुन त्यांनी कोरोना काळात महत्वाची भुमिका बजावत महसुलचे प्रत्येक काम वेळेवर करत या भागातील सर्व खातेदार – शेतकऱ्यांसाठी वेगळीच माणुसकी निर्माण करून महसुल मध्ये तलाठी कसा असावा असा आदर्श निर्माण करून दिला.
यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोकुळ देसाई, शिक्षक एस.आर. शिंदे, सुरेश देसाई, युनुस पटेल, दिनकर शिंदे आदीची भाषणे झाली. निरोपाला उत्तर देतांना कामगार तलाठी अविनाश तेलतुंबडे यांनी आवरत तिनही गावाने खुप प्रेम दिले, म्हणूनच कामाची प्रेरणा मिळत गेली. त्यामुळे शासनाच्या आदेश व नियमाप्रमाणे काम करत गेल्याने एवढया मोठया संख्येने आपण माझा सन्मान केल्याबद्दल आपल्या ऋणामध्येच राहू इच्छितो असे तलाठी A.J. तेलतुंबडे म्हणाले.
३० वर्ष महसुल मध्ये सेवा केलेल्या जेष्ठ व्यक्तीने असा तलाठी होणे नव्हे हाच सर्वाच्च पुरस्कार – संदिप जगताप, नाऊर येथील तलाठी अविनाश तेलतुंबडे यांना निरोप

0Share
Leave a reply