Disha Shakti

राजकीय

राष्ट्रीय समाज पक्षाच्या २१ व्या वर्धापन दिनाचे आयोजन

Spread the love

दिशाशक्ती प्रतिनिधी / भारत कवितके : गुरुवार दिनांक २९ आगस्ट २०२४ रोजी सकाळी ११वाजता मराठा मंगल कार्यालय, रेल्वे स्टेशन जवळ, रामदास पेठ, अकोला या ठिकाणी राष्ट्रनायक, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष मार्गदर्शक महादेव जी जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय समाज पक्षाच्या २१ व्या वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाला २९ आगस्ट २००३ रोजी दिल्लीतून निवडणूक आयोगाने मान्यता दिली, राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना प्रचंड संघर्षातून नेतृत्व निर्माण करणारे कणखर महादेव जी जानकर यांनी केली.महादेव जी जानकर म्हणजे एक त्यागी नेतृत्व होय, म्हसवड येथील सभेत शपथ घेतल्यानंतर ते आपल्या घरी न जाता वाड्या वाड्यातून,गावा गावातून भटकंती करीत करीत आपले जीवन जगत राहिले.

यश अपयश पचवित महादेव जी जानकर आपला रस्ता चालत राहिले.अकोला येथील राष्ट्रीय समाज पक्षाच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त महादेवजी जानकर, एस.एल.अक्कीसागर, गोविंद राव शुरनार, बाळकृष्ण लेंगरेमामा, कुमार सुशील पाल, काशिनाथ नाना शेवते, रत्नाकर गुट्टे, ज्ञानेश्वर माऊली सलगर, डॉ.तौसिफ शेख आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!