दिशाशक्ती प्रतिनिधी / किरण थोरात : प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य आयोजित पुरस्कार २०२४ साठी सौ. वसुधा वैभव नाईक राहणार पुणे यांना ‘जीवन गौरव ‘ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आदर्श शिक्षिका, लेखिका, कवयित्री व समाजसेविका इत्यादी क्षेत्रात त्या उल्लेखनीय काम करतात. याची दखल घेत हा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी श्री. बाळासाहेब तोरस्कर यांनी भूषवले. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. प्रसिद्ध साहित्यिक पत्रकार डॉक्टर ख.रं.माळवे यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष, आयोजक मा. श्री. नागेश हुलवळे यांनी स्वागत पर भाषण केले, सर्व मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी प्रमुख उपस्थिती पद्मश्री डॉ. डी. जी. यादव, डॉ. रेडिक एंजल्स, डॉ. सुकृत खांडेकर, श्री. भानुदास केसरे, श्री. प्रमोद महाडिक, श्री. रामकृष्णन कोळवणकर, श्री. राजेश कांबळे, डॉ. नॅन्सी अब्लुकर्क इत्यादी मान्यवर उपस्थित होते.याच कार्यक्रमात नवोदित कवींच्या काव्यासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.पत्रकार,शिक्षक, कवी, लेखक इत्यादी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २०० पेक्षा जास्त मान्यवरांना पुरस्कार देऊन या कार्यक्रमात गौरवण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन करणारे नॅशनल लायब्ररी, पी. बी. ई. सोसायटीचे नाईट कॉलेज, वर्ड विजन संस्था, लेखक रमेश पाटील, मा. प्रमोद सूर्यवंशी, मा. योगेश हरणे इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले होते.
Leave a reply