Disha Shakti

ई-पेपरराजकीय

कोरम अभावी राहुरी खुर्द ग्रामपंचायतची ग्रामसभा तहकूब, सरपंचांसह अनेक सदस्यांनी फिरवली ग्रामसभेकडे पाठ

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा शुक्रवारी (ता.30 ऑगस्ट) रोजी सकाळी १०:३० वाजता आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार होती. मात्र कोरमअभावी आजची ग्रामसभा तहकूब करण्यात आल्याचे ग्रामपंचायत उप सरपंच तुकाराम बाचकर यांनी जाहीर केले.

राहुरी खुर्द ग्रामपंचायतने 15 ऑगस्ट रोजी होणारी ग्रामसभा 30 ऑगस्ट रोजी राहुरी खुर्द बुवासाहेब मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती ग्रामसभा उपसरपंच तुकाराम बाचकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू करण्यात आली होती. यावेळी या ग्रामसभेत 25 ते 30 नागरिकांमध्ये ग्रामसभेला सुरवात देखील झाली.

परंतु राहुरी खुर्द येथील ज्येष्ठ नागरीक गेनूभाऊ तोडमल यांनी ग्रामसभेतील नागरिक व ग्रामपंचायत सदस्य यांची समोरील उपस्थिती पाहून उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना ग्रामसभेबाबत नियमावलीची आठवण करून देत कोरम पूर्ण नसताना ग्रामसभा कोणत्या नियमाने चालू केली असा प्रश्न उपस्थीत केला असता या ग्रामसभेचे अध्यक्ष उपसरपंच तुकाराम बाचकर यांनी ही ग्रामसभा कोरम पूर्ण झाले नसल्याचे कारण देत लगेच ग्रामसभा तहकूब केल्याचे जाहीर केले.

परंतु या ग्रामसभेमध्ये सरपंच मालतीताई साखरे यांच्या सह 10 ग्रामपंचायत सदस्य उपस्थीत नसल्याने ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थीत केला जर सदस्यांना जर ग्रामसभेचे गावातील जनतेच्या प्रश्नांचे गांभीर्य नसेल व वेळ नसेल तर अशा सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी उपस्थीत नागरिकांनी यावेळी केली व अनुपस्थित सदस्यांची नोंद घेण्याची मागणी ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकारी यांना केली. तसेच गोटुंबे आखाडा येथे 23 तारखेची नोटीस 28 तारखेला लावली असून तसेच गावामध्ये लाऊड स्पीकरद्वारे पाणी पट्टीबाबत भरण्याबाबत सूचना देण्यात येते परंतु ग्रामसभा हा महत्वाचा गावाचा विषय असूनही याद्वारे ग्रामस्थांना सूचित न करण्यात आल्यामुळे व तसेच गोटुंबे आखाडा येथील नागरिकांना वेळोवळी ग्रामसभेबाबत अंधारात का ठेवले जाते असा प्रश्न उपस्थीत केला जात आह़े.

यावेळी ग्रामपंचायतच्या 15 सदस्यांपैकी उपसरपंच तुकाराम बाचकर, शिवाजी पवार, मनीषा आघाव, राम तोडमल मंगल शेडगे इत्यादी सदस्य उपस्थीत होते. पुढील ग्रामसभा 4 सप्टेंबर 2024 रोजी बुधवारी आयोजित करण्यात आल्याचे ग्रामविकास अधिकारी प्रभाकर चव्हाण यांनी जाहीर केले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!