Disha Shakti

क्राईम

नेवासा येथील त्या हत्याकांडाचा अखेर उलगडा, प्रियकराच्या मदतीने पतीचा खुन करणारी वकील पत्नी प्रियकरासह ताब्यात

Spread the love

विशेष प्रतिनिधी /इनायत अत्तार :  नेवासा तालुक्यातील पाचेगाव शिवारातील एका शेतामध्ये १६ ऑगस्ट रोजी एका अनोळखी व्यक्तीचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी पंधरा दिवसांत हत्येचा शोध लावला असून पत्नीने प्रियकराच्या मदतीने खून केल्याचे समोर आले आहे. यामध्ये पत्नी मीरा मस्के व तिचा प्रियकर लहू डमरे – (ढोकसळ, ता. बदनापूर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांची पाच विशेष पथके आणि पोलिस निरीक्षक हे स्थानिकांच्या मदतीने हत्येचा तपास करीत होते. मृतकाची ओळख पटविण्यासाठी पाच पोलिसांचे एक पथक उज्जैन (मध्य प्रदेश) मधून आले होते. गत आठवड्यात पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनीही घटनास्थळी भेट देत तपासाचा आढावा घेतला होता.

नेवासा, श्रीरामपूर रोडवरील सलग सात दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासणी करत असताना एक गाडी संशयीतरीत्या फिरत असल्याचे आढळून आले. या गाडी मालकाची माहिती काढली असता ही गाडी अंबादास भानुदास म्हस्के  (रा. रमाबाई नगर, ता. जि. जालना) यांच्या नावावर असल्याचे उघड झाले. त्याची पत्नी मीना अंबादास म्हस्के ही लोणी, ता. इंदापूर, जि. पुणे येथे भाडोत्री खोलीत राहत असल्याची माहिती मिळाली. यानंतर गुरुवारी (२९ ऑगस्ट) त्या महिलेचा शोध घेत पोलिस पथक लोणी येथे पोहोचले. त्यावेळी मीना अंबादास म्हस्के (वय ३६) हिच्यासह प्रियकर लहू शिवाजी डमरे (वय ३१) यांना ताब्यात घेतले.

यानंतर गुन्हाबाबत विचारपूस केला असता लहू डमरे याने त्याचे मीना म्हस्के हिच्यासोबत प्रेमसंबंध असून, तिचा पती अंबादास हा तिला त्रास देऊन चारित्र्यावर संशय घेत होता. त्याला पुण्याला कामाच्या ठिकाणी जायचे आहे, असे सांगून एका गाडीत बसवले. त्यानंतर रात्रीच्या वेळी त्याचा गळा आवळून तो खाली पडल्यानंतर गळा कापला व तिथून निघून गेलो, असे डमरे याने सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी नेवासा पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, शेवगाव उपविभागीय अधिकारी सुनील पाटील, नगर पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, नेवासा पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तुषार धाकराव, अनंत सालगुडे, संदीप दरंदले, अमृत आढाव, प्रमोद जाधव, रोहित येमुल, बाळासाहेब खेडकर, शरद बुधवंत, यांनी केली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!