Disha Shakti

इतर

पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पोलीस बंदोबस्तातील गाडीचा भीषण अपघात; संगमनेर पोलीस स्टेशनचे तिघे जखमी

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : शहरात सय्यद बाबा चौक येथे उरूस भरलेला आहे. या उरुसला भेट देण्यासाठी लोणीवरून महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील येत होते. त्यांचे संगमनेर शहरात आगमन होत असतानाच समनापूर परिसरातील गणपती मंदिराजवळ पोलीस बंदोबस्तातील गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल फडोळ, पो. कॉ. विजय आगलावे, गणेश थोरात हे गंभीर जखमी झाले आहेत. ना.विखे पाटील काल रात्री अचानक नऊ वाजण्याच्या दरम्यान संगमनेर शहरातील सय्यद बाबा चौक येथे उरुसला भेट देण्यासाठी येत होते.

तेव्हा त्यांना शहर पोलीस ठाण्यातील एका गाडीचा बंदोबस्त देण्यात आला. ही गाडी मंत्री विखे पाटील यांना घेण्यासाठी गेली. गाडी त्यांना घेऊन येत असताना समनापूर परिसरातील गणपती मंदिराजवळ ओव्हरटेक करत असताना चारचाकी कार (एमएच १४, एल. यू.१३८५) व पोलीस गाडी (एमएच १६, डीजी ५९८४) यांचा भीषण अपघात झाला. यातच वेगवान गतीमुळे आणखी दोन कारने धडक घेतली. या अपघातात सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल फडोळ यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली तर पो. कॉ. विजय आगलावे यांच्या हाताला मोठी दुखापत झाली आणि पो.कॉ.गणेश थोरात हे देखील जखमी झाले आहेत. या सर्वांवर खासगी रुग्णलयात उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती समजताच मंत्री विखे पाटील यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!