बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार कासराळीकर : बिलोली तालुक्यातील मौजे कासराळी येथे साहीत्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 104 वी जंयती उत्साहात साजरी करण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच कासराळी चे सरपंच सौ.कविता संभाजी टोम्पे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमास कासराळी नगरीचे मा.सरपंच अरविंद ठक्करवाड, मा.सरपंच शेषराव लंके,पो लीस पाटील माधव ठक्करवाड, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष पा.शिदे, शिवानंद पा.सोमासे,संभाजी टोम्पे, शेषराव गज्जोड, परमेश्वर गजलोड, बालाजी मुनलोड, व्यंकट इंगळे, शिवाजी पा.शिदे, दिपक टोम्पे, मोहन इंगळे, गजानन गुरुंदे, पिराजी इंगळे, राजु इंगळे तसेच मान्यवर मंडळी उपस्थित होते.
अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर आधारित भाषणांचा कार्यक्रम पाफ पडला. सायंकाळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे भव्य मिरवणूक रामराज्य चौक ते मुख्य बाजारपेठेपर्यंत काडण्यात आले. मध्ये मिरवणुकीत महिला, तरुण बांधव समाज बांधव व ग्रामस्थांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
Leave a reply