पारनेर प्रतिनिधी / वसंत रांधवण : पारंपरिक उद्योग, व्यवसाय करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांसाठी शासनाने प्रधानमंत्री ‘विश्वकर्मा’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घ्यावा, ही योजना शनिवार (दि. ३१) व रविवार (दि. १) अशी दोन दिवस सुरू राहणार आहे. पंतप्रधान विश्वकर्मा योजना तसेच वृद्ध नागरिकांसाठी वयोश्री योजना सुद्धा सुरू आहे, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना या तिन्ही योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन टाकळीढोकेश्वर ग्रामपंचायतच्या सरपंच अरुणा खिलारी व टाकळीढोकेश्वर ग्रामपंचायतने केले आहे.
यासाठी ग्राहक सुविधा केंद्र किंवा ग्रामपंचायतीकडे नोंदणी करावी, यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य ही योजना सुतार, सोनार, लोहार, चांभार, मिस्त्री, मुर्तीकार, धोबी, शिंपी, कुंभार, नाभिक, विणकर, चटई झाडू बनविणारे, हार-तुरे तयार करणारे, दोऱ्या वळणारे, होड्या बांधणारे, मासेमारीचे जाळे बनवणारे, कुलूप तयार करणारे, पारंपारिक खेळणी बनविणारे या कारागीरांसाठी आहे. वरील तिन्ही योजनेसाठी पात्र लाभार्थी आहेत त्यांनी ग्रामपंचायत टाकळीढोकेश्वर येथिल कार्यालयात अर्ज दाखल करावे असे आवाहन टाकळीढोकेश्वर ग्रामपंचायतीचे सरपंच अरुणा खिलारी, उपसरपंच रामभाऊ तराळ व सर्व सदस्यांनी केले आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य (ग्राम पं विभाग)कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, पारनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दयानंद पवार, विस्तार अधिकारी संजय जगताप, ग्रामविकास अधिकारी बी. एम. दावभट, निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अंकुश पायमोडे, ओबीसी सेलचे उपाध्यक्ष मळिभाऊ रांधवण यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
Leave a reply