विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : नेवासा तालुक्यातील पानेगाव-करजगाव रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ एका मुलीला अज्ञात व्यक्तीने मारहाण केल्याची घटना सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. पानेगाव येथून करजगाव येथे शाळेत येत असताना मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने तिचे तोंड दाबून मारहाण केल्याचे सदर मुलीने सांगितले. सदर मुलगी ही करजगाव येथील एका विद्यालयात शिक्षण घेत आहे. शाळेत आल्यावर तिने शिक्षकांना हा प्रकार सांगितला. शिक्षकांनी पालकांना संपर्क करत शाळेत बोलावून घेतले. या घटनेचे गांभीर्य ओळखुन प्राचार्य व पोलीस पाटील यांनी याबाबत सोनई पोलिसांना कळविले.
माहिती कळताच सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी करजगाव येथे येत विद्यालय व घटना झालेल्या परिसरात जाऊन पाहणी केली. विजय माळी यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सूचना देत मार्गदर्शन केले. तसेच पालकांनी व परिसरातील नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन केले. यावेळी पोलिसांनी करजगाव-पानेगाव रोडवर विविध ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीची पाहणी केली. यावेळी शालेय वेळेमध्ये पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
नेवासा तालुक्यातील पानेगाव-करजगाव रस्त्यावर शाळेतील मुलीला अज्ञात व्यक्तीकडून तोंड दाबून मारहाण

0Share
Leave a reply