दिशाशक्ती न्यूज नेटवर्क : शनिवार दिनांक ३१ आगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता बोरीवली पूर्व येथील राजर्षी शाहू महाराज संस्कार केंद्र,स्व.शैलजाताई विजय गिरकर समरसता सभागृह, फुलपाखरू उद्यान येथे विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषद च्या वतीने विमुक्त दिनाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती, व उमाजी नाईक यांच्या फोटो ला हार अर्पण करून दिप प्रज्वलन करण्यात आले.गिरीधर सांळुखे कार्यवाह मुंबई यांनी सर्व मान्यवरांचा परिचय करून देऊन भटक्या विमुक्तांचा पूर्व इतिहास सांगितला,सौ.निहारिका खोंदले सचीव भाजपा मुंबई व अध्यक्षा धनगर समाज एकता मंडळ,सौ.अर्चना लष्कर महिला अध्यक्षा, बबनराव मोहिते उपाध्यक्ष भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र, भारत कवितके मुंबई कांदिवली पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ता, आदी मान्यवरांनी या वेळी मार्गदर्शन केले.
भारत कवितके यांनी आपल्या भाषणात सांगितले की,” संघर्षमय जीवन जगणाऱ्या भटक्या विमुक्तांना मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे.त्यांच्या जीवनात रोजचाच संघर्ष सुरू असतो.त्यांच्या पर्यंत शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळायलाच हवा, आणि शेवटी ३१आगस्ट भटक्या विमुक्त दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.”या भटक्या विमुक्त दिनाच्या निमित्ताने सहदेव रसाळ, गिरीधर साळुंखे, बबनराव मोहिते,सौ.निहारिका खोंदले, सौ.अर्चना लष्कर,लहू पवार, मधुकर कुचेकर व विमुक्त जनजाती विकास परिषद चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
संघर्षमय जीवन जगणाऱ्या भटक्या विमुक्तांना मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे – भारत कवितके.

0Share
Leave a reply