पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा गावातील मांजरधाव वस्तीनजीक असलेल्या विहिरीत तरुणाने विहिरीमध्ये उडी मारून जीवन संपल्याची घटना घडली आहे. नगर शहरातील नालेगाव येथील अमोल राजू जाधव (वय २७) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या आत्महत्येमागेचे कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नसून पारनेर पोलिसांकडून तपास चालू आहे.
गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास विहिरीमध्ये अमोल जाधव याने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना विहिरीच्या काठावर ठेवलेल्या त्याच्या पाकीट, चष्मा, दोन चप्पलांवरून निदर्शनास आली. यानंतर ग्रामस्थांनी घटनेची माहिती पारनेर पोलीस स्टेशनला कळविण्यात आली. त्यानंतर पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मानसिंग शेलार, पोलीस कॉन्स्टेबल सतीश बर्डे, पोलीस कॉन्स्टेबल सारंग वाघ यांनी पंचनामा करून बाज व दोराच्या साह्याने विहिरीमधून अमोल याचा मृतदेह बाहेर काढून पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
Leave a reply