विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : शेतकरी व बैल यांचे एक विश्वासाचे नाते असते याच नात्यातून उत्साहात साजरा होणारा बैलपोळ्यावर पावसाचे सावट होते. बैलपोळा जरी उत्साहात साजरा करण्यासाठी शेतकरी सज्ज झालेला होता. मात्र, बाजारात बैलांचे साज महागले आहेत. तर सततच्या पावसामुळे मुग, सोयाबीन, बाजरी, मका, उडीद या पिकांना मोठा फटका बसला असल्याचे परिसरातील शेतकरी वर्गतून बोलले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा यंदाचा बैलपोळा आर्थिक संकटात सापडला असल्याचे दिसून आले.
तसेच यांत्रिकीयुगात बैलांची संख्या घटली आहे. सोमवारी सायंकाळी गावाच्या वेशीसमोर मारूती मंदिरासमोर शेतकरी बांधवांनी आपली बैलजोडी आणून पोळा सण साजरा केला. महात्मा फुले चौक येथुन बैलांची सजावट करून ढोल ताशांचा गरज करत डिजेच्या तालावर बैलांची मिरवणूक काढण्यात आली होती.
अनेकांनी बैल तसेच गायीच्या सजावटीसाठी आर्थिक परिस्थितीमुळे सजावटीचे साहित्य खरेदीसाठी उत्साह दाखविला नाही. त्यामुळे व्यापारी पेठेत देखील यावर्षी शुकशुकाट दिसून आला.परिणामी सोमवारी अवघ्या दहा ते पंधरा बैल जोड्या मारुती मंदिरासमोर आल्या होत्या. टाकळीढोकेश्वर येथील धुमाळ वस्ती व शी संत सावतामाळी बैलगाडा व पायमोडे बंधूंनी बैलांची सजावट करून गावातून भर पावसात भिजून सवाद्य मिरवणूक काढली. या दोन मिरवणुका मुख्य आकर्षण ठरले
सायंकाळी मानाचा पोळाची मारुती मंदिरात आरती झाल्यानंतर बैलांची मिरवणूक काढून वेशीसमोर आणण्यात आले. त्यानंतर शेतकरी बांधवांनी वाजत गाजत बैल आपल्या घरी नेले.यावेळी निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी, माजी उपसरपंच सुनील चव्हाण, माजी सरपंच शिवाजी खिलारी, उपसरपंच रामभाऊ तराळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अंकुश पायमोडे, ओबीसी सेलचे उपाध्यक्ष मळिभाऊ रांधवण, विलास धुमाळ, राहुल घुले, जयसिंग झावरे, बाळकृष्ण पायमोडे,धोंडीभाऊ झावरे यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.
Leave a reply