बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार कासराळीकर : बिलोली तालुक्यातील सलग तीन दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेले पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आरळी, कौठा, डौर, गुजरी या गावांना गोदावरी Back water मुळे सोयाबीन, कापूस, तूर,उडीद,मूग ही पिके पाण्यात गेले आहेत. यामुळे शेतकरी हवालदील झाला असून शासनाने त्वरित याचे पंचनामे करून नदीकाडच्या गावांना गोदावरी back water मुळे दरवर्षी पिकांच्या प्रचंड नुकसानीचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना कायमस्वरूपी शासकीय मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाच्या माध्यमातून तहसीलदार बालाजी मिठेवाड यांना दिले. त्यावेळी नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देऊन न्याय द्यावे अशी मागणी जि.प.सदस्य तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस मा.लक्ष्मण ठक्करवाड यांनी तहसीलदार यांचाकडे केली.
पाहणी करताना प्रदेश कार्यकारिणी सदस्य उमाकांतराव गोपछडे,भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रशेखर पाटील सावळीकर, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस आबाराव संगनोड, युवामोर्चा तालुका अध्यक्ष संदीप पाटील रामपुरे त्यांनी पाहणी केली. समवेत कृषी अधिकारी तिडके,तलाठी राठोड,तलाठी पवन ठकरोड गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ मंडळी व शेतकरी बांधव उपस्थित होते.
Leave a reply