तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील पत्रकार तथा धाराशिव बालकल्याण समितीचे सदस्य दयानंद काळुंखे यांना राज्यस्तरीय दर्पण रत्न पत्रकार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे. गेल्या पंधरा वर्षापासून विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी भरीव कामगिरी केले असून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लेखणीच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला आहे. एवढेच नाही तर अंधश्रद्धा रूढी परंपरा परिवर्तनाच्या माध्यमातून दूर करण्यासाठी प्रयत्नशील असून कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण तुळजापूर तालुक्यात जनजागृती अभियान राबवून एक वेगळा आदर्श व पायंडा घालून दिला आहे.
जिल्हाभरात बालविवाह रोखण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून समुपदेशन मार्गाने असंख्य बालविवाह रोखण्यात त्यांना यश आले आहे.शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान भरीव असून त्यांच्या कार्याचे दखल घेत सोलापूर येथील गरुड फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश पुजारी यांनी हा पुरस्कार जाहीर केला आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जय मल्हार पत्रकार संघ, ईटकळ ग्रामीण पत्रकार संघ, खडकाळी ग्रुप,8 फार्म ग्रुप व अनेक मित्रपरिवाने त्यांच्या अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
Leave a reply