पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : भाऊसाहेब महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित समता विद्यालय तिखोल येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त 5 सप्टेंबर शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका बजावत आज शाळेचे कामकाज पाहिले. यानंतर त्याच विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. समृद्धी मंचरे हिने केले. याप्रसंगी समता विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.पांडुरंग बर्वे सर, ज्येष्ठ शिक्षक झावरे सर, भोबाळ सर, मोरे सर , श्रीमती. संगीता ठाणगे मॅडम, शाळेचे नाईक श्री. भाऊसाहेब रोहकले मामा, श्री.भानुदास ठाणगे मामा. यावेळी उपस्थित होते.
Homeशिक्षण विषयीभाऊसाहेब महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित समता विद्यालय तिखोल येथे शिक्षक दिन उत्साहात संपन्न..
भाऊसाहेब महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित समता विद्यालय तिखोल येथे शिक्षक दिन उत्साहात संपन्न..

0Share
Leave a reply