Disha Shakti

इतर

पारनेरमधील हिवरे कोरडा येथे सून व सासर्‍याचा शेततळ्यात बुडून मृत्यू

Spread the love

पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथील हिंगणदरा वस्तीवर शेततळ्यात पाणी काढण्यासाठी गेलेल्या सूनेचा व तिला वाचविण्यासाठी गेलेल्या सासर्‍याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली आहे. मुरलीधर मारूती नवले (वय 70) व उज्वला आबा नवले (वय 40, दोघे रा. हिवरे कोरडा) असे मयतांची नावे आहेत. मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी शेततळ्यातून पाणी काढण्यासाठी गेलेल्या सूनेचा पाय घसरून त्या शेततळ्यात पडल्या.

त्यांना वाचविण्यासाठी सासर्‍याने तात्काळ धाव घेतली मात्र त्यांनाही पोहता येत नसल्यामुळे त्यांचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अधिक महिती अशी की, उज्वला नवले या आपल्या शेत तळ्यात पाणी पाणी काढण्यासाठी गेल्या होत्या. पाणी काढत असताना त्यांचा पाय घसरून त्या तळ्यात पडल्या. याची माहिती त्यांचे सासरे मुरलीधर यांना मिळाली असता त्यांनी तात्काळ तळ्याकडे धाव घेतली. मात्र सासरे वयोवृध्द असल्यामुळे सूनेचा प्राण वाचवण्यासाठी ते अपयशी ठरले व त्यांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती तात्काळ पारनेर पोलिसांना कळविण्यात आली. मुरलीधर नवले व उज्वला नवले यांचे मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने तळ्यातून बाहेर काढून पारनेर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मानसिंग शेलार, पोलीस नाईक सतीश बर्डे हे करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!