राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : प्रहार दिव्यांग संघटना व दिव्यांग शक्ती सेवा संस्था राहुरी यांच्या वतीने ज्या दिव्यांगाकडे युनिक आयडी कार्ड किंवा MH 16 अंकी नंबर असणारे ऑनलाइन प्रमाणपत्र नाही आशा दिव्यांगाना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात येऊ नये.तसेच. शिबिरा मार्फत घेण्यात आलेल्या अंतोदय रेशन कार्ड दिव्यांग बांधवांना वाटप करून निकाली काढावे. संजय गांधी निराधार योजनेची मीटिंग झाल्यानंतर मंजूर व नामंजूर ची यादी दिव्यांग शक्ती सेवा संस्थेस मिळावी 65 वर्षावरील सर्व दिव्यांगाचे विना अट संजय गांधी निराधार किंवा श्रावणबाळ योजनेचे प्रकरण मंजुर त्यांना लाभ देण्यात यावा.
तसेच राहुरी तालुक्यातील आपल्याकडे नोंदणीकृत आसलेल्या दिव्यांगाकडे ऑनलाईन दिव्यांग प्रमाण पत्र MH युडीआयडी 16 अंकी नंबर आसलेले दिव्यांग प्रमान पञ किंवा युनिक आयडी कार्ड आहे आशाच दिव्यांगास संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात यावे. ज्या दिव्यांग बांधवांकडे ऑफलाइन दिव्यांग प्रमान पञ आहे आशा दिव्यांगाना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात येऊ नये. कारण अ.नगर जिल्हात बोगस दिव्याग प्रमाणपत्राचे प्रमान खूप वाढले आहेत बोगस दिव्यांग प्रमान पञ घेऊन दिव्यांगाच्या योजनाचा फायदा घेत आहे. शासनाची फसवनुत केली जात आहे. या मुळे खऱ्या दिव्यांगावर अन्याय होत आहे . अशा मागण्यासाठी निवेदन देण्यात आले या वेळी नयाब तहसीलदार दळवी मॅडम व संजय गांधी विभागाचे नायब तहसीलदार औटी साहेब यांनी आपल्याला आश्वासन दिले कि नक्कीच आम्ही तुमचे सर्व प्रश्न मार्गी लाऊ व आपल्या संघटनेचे कौतुक केल या वेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे उत्तर अ.नगर जिल्हाअध्यक्ष तथा दिव्यांग शक्ती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.मधुकर घाडगे साहेब ,प्रहार दिव्यांग संघटनेचे उत्तर अनगर जिल्हा सल्लागार तथा दिव्यांग शक्ती सेवा संस्थेचे खजिनदार सलीमभाई शेख ,
प्रहार दिव्यांग संघटनेचे राहुरी तालुका अध्यक्ष तथा दिव्यांग शक्ती सेवा संस्थचे सदस्य मा.योगेश लबडे,राहुरी शहर कार्याध्यक्ष संजय देवरे,राहुरी शहरअध्यक्ष जुबेर मुसानी,चेडगाव शाखाध्यक्ष सतीश तरवडे मोहन कोळेकर उपस्थित होते.
Leave a reply