Disha Shakti

शिक्षण विषयी

अणदूर येथील राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेला उत्तम प्रतिसाद, शिक्षण महर्षी सि ना आलूरे गुरुजींच्या जयंतीनिमित्त स्पर्धा संपन्न

Spread the love

अणदूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जवाहर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये शुक्रवार दि.६ सप्टेंबर रोजी शिक्षण महर्षी सि ना आलूरे गुरुजी यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय अंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळ अणदूरचे सचिव तथा सरपंच रामचंद्र आलुरे यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमाला महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मारुती खोबरे, ज्येष्ठ गुरुवर्य व ग सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य बालाजी घुगे, जवाहर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी,उपप्राचार्य डॉ.मल्लिनाथ लंगडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते शिक्षण महर्षी सि ना आलुरे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उमाकांत चनशेट्टी यांनी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित विविध उपक्रमाबद्दल माहिती देताना राज्यस्तरीय अंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे महत्त्व स्पष्ट केले. त्याचबरोबर स्पर्धेसाठी हा विषय निवडताना आलेले अनुभवही त्यांनी व्यक्त केले आणि अहवाल वाचन केले.

अध्यक्षीय समारोपामध्ये संस्थेचे सचिव रामचंद्र आलुरे यांनी शिक्षण महर्षी सि ना आलूरे गुरुजी यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल माहिती दिली. “कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवासाठी तारक की संहारक” हा या स्पर्धेचा विषय होता. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी, दयानंद महाविद्यालयाचे प्रा डॉ राजशेखर शिंदे, धाराशिव येथील ज्येष्ठ पत्रकार रवींद्र केसकर यांनी काम पाहिले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ मल्लिनाथ बिराजदार यांनी केले तर प्रा डॉ राजशेखर नळगे यांनी आभार मानले. स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रभावीपणे आपली मतं मांडली.

या कार्यक्रमाप्रसंगी परीक्षक अरविंद जोशी आणि रवींद्र केसकर यांच्यासह स्पर्धक विद्यार्थ्यांमधून निलंगा येथील गीता वाडकर आणि रत्नशिल सोनकांबळे,संगमनेर येथील आकाश बोडके,पुणे येथील अमृता वाघमारे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.या स्पर्धेसाठी पुणे,लातूर, सोलापूर, निलंगा, अहमदनगर, संगमनेर, धाराशिव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

यावेळी स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे सन्मानचिन्ह, ३१०००/-, २१०००/-, आणि १५०००/- रुपये याप्रमाणे देण्यात आले तर उत्तेजनार्थ म्हणून प्रमाणपत्र सन्मानचिन्ह रु ७५००/-,त्याचबरोबर उत्कृष्ट वक्ता म्हणून दोन स्वतंत्र पारितोषिके देण्यात आली. यांना प्रत्येकी रु.५०००/- आणि यशसंपादीत सर्व विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. क्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ मल्लिनाथ बिराजदार यांनी केले तर प्रा डॉ राजशेखर नळगे यांनी आभार मानले

यांनी मिळविली पारितोषिके 

प्रथम क्रमांक – फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथील चैतन्य रघुनाथ बावधाने आणि पार्थ रामदास मेंढेकर, द्वितीय क्रमांक- सर परशुराम महाविद्यालय पुणे येथील रमेश सुनील कचरे आणि अमृता दत्ता वाघमारे,तृतीय क्रमांक- न्यू आर्ट, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज अहमदनगर येथील महेश जनार्दन उशीर आणि आकाश दत्तात्रय मोहिते उत्तेजनार्थ दयानंद महाविद्यालय सोलापूर येथील पृथ्वीराज नागनाथ कुरे आणि पर्जन्य निल अंजूटगी यांना तर प्रभावी वक्ता हे पारितोषिक राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथील ज्योती भगवान कांबळे आणि माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय छत्रपती संभाजी नगर येथील स्वप्निल सोपान खरात यांनी या वादविवाद स्पर्धेतील पारितोषिके मिळविले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!