Disha Shakti

राजकीय

अहमदनगरच्या ग्राऊंडवर गुजरातची ‘फिल्डिंग’; भाजपचा पॅटर्न ठरणार का यशस्वी ? , गुजरातच्या पदाधिकाऱ्यांची टीम अहमदनगर जिल्ह्यात

Spread the love

जिल्हा विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : विधानसभा निवडणुकीत कोणताही गाफिलपणा पत्करण्यास भाजप तयार नाही. सूक्ष्म प्लॅनिंगमध्ये भाजप असल्याचे दिसते. राज्यातील स्थानिक नेते वादापासून दूर राहताना दिसत असून, गाऊंडवरील काम गुंतलेत. संघटनात्मक बांधणी करत आहे.

यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी गुजरातमधील आजी-माजी आमदार, माजी मंत्री महाराष्ट्रातील मैदानात उतरले आहे. नगर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात संघानात्मक बांधणीसाठी गुजरातमधील आजी-माजी १२ आमदारांनी तळ ठोकला आहे. नगरच्या मैदानावर गुजरातची ही फिल्डिंग किती ताकदीची ठरणार, याची आता चर्चा सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुती भाजपला महाराष्ट्रात चांगलाच फटका बसला. महाविकास आघाडीने राज्यात चांगले यश मिळवले. महाराष्ट्रातील बदलाचा हा फटका देशपातळीवर बसू लागल्याने भाजपने विधानसभा निवडणुकीत हे अपयश पुसून टाकण्याची तयारी केली आहे. यासाठी भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीत लक्ष घातले आहे. नगर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात गुजरातमधील आजी-माजी आमदारांना अमित शाह यांनी मैदानात उतरवले आहे. हे १२ आजी-माजी आमदार संघटनात्मक बांधणी करणार आहेत.

या गुजरातमधील आजी-माजी आमदारांना बुधवारी नाशिकमध्ये बोलावून घेण्यात आलं होतं. त्यातील आमदारांना नगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाची माहिती देण्यात आली. हे आमदार स्थानिक पातळीवरील बूथ केंद्रप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते, निरीक्षक आणि सर्वसामान्यांशी संवाद साधणार आहे. समाजातील वेगवेगळ्या घटकांनाही भेटून भाजपसाठी समर्थन मिळावे म्हणून गाठीभेटीवर भर देणार आहेत. यानंतर हे आमदार आपला अहवाल तयार करून भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे देणार आहेत.

 नगरमधील १२ तालुक्यात नियुक्त केलेले गुजरातमधील आमदार पुढीलप्रमाणे :
कन्हैयालाल किशोरी ( अकोले), जगदीश मकवाना (संगमनेर), राजेंद्र त्रिवेदी ( शिर्डी), सनमभाई पटेल (कोपरगाव), गणेश बिरारी (श्रीरामपूर), नैलेश शहा (नेवासा), प्रवीण माळी (शेवगाव), महेंद्र पटेल (राहुरी), बिपिन सिक्का (पारनेर), महेश कासवाल (अहमदनगर),देवाशू देसाई (श्रीगोंदा), अनिरुद्ध दिवे (कर्जत जामखेड)

अहमदनगरमध्ये शहा – विखे पर्व

भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून नगर जिल्ह्याचे भाजपचे नेते राधाकृष्ण विखे यांनी पक्षाचे नेते केंद्र मंत्री अमित शहा यांच्याशी जवळीक वाढली आहे. मंत्री विखे दिल्लीला गेल्यावर अमित शहा यांच्याशी भेट नक्की असते. यातच गुजरातमधील १२ आमदार भाजपच्या संघटनात्मक बांधणीसाठी मंत्री विखेंच्या नगर जिल्हा बालेकिल्ल्यात आल्याने राजकीय चर्चांना पेव फुटले आहे. या विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात शहा – विखे पर्व दिसणार असे सांगितले जात आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!