राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथे भानसहिवरे (ता. नेवासा) येथील कृषी महाविद्यालयातील कृषीदुतांनी शेतकऱ्यांना बिज प्रक्रिया कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले.ग्रामीण जागृकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून कृषीदुतांनी बिज प्रक्रिया कसे करावे, बिज प्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी, बिज प्रक्रिया केल्याचे फायदे, बिज प्रक्रिया केल्याने उत्पादनात होणारा फायदा याबद्दल कृषीदूत अमित्य जाधव, संकेत गुंड, निखिल गोडसे, अभिषेक गोडे, निलेश बैरागी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी कृषीदुतांना प्राचार्य डॉ. प्रकाश तुरबतमठ, कार्यक्रम समन्वयक प्रा. एम. आर. माने, प्रा. खाटीक सर यांचे मार्गदर्शन लाभले.
Leave a reply