Disha Shakti

शिक्षण विषयी

स्वर्गीय विलास बानकर इंग्लिश मीडियम स्कूल ‘आदर्श विद्यालय’पुरस्काराने सन्मानित..

Spread the love

राहुरी तालुका प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : आहिल्यानगर येथे Rotary club of Ahmednagar Integrity च्या वतीने रोटरी ज्ञान गौरव पुरस्कार सोहळा २०२४ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्ष व रयत शिक्षण संस्था सातारा च्या सदस्या श्रीमती मीनाताई माणिकराव जगधने या होत्या, तसेच शिक्षण आयुक्त महाराष्ट्र शासन दिनकर टेमकर, शिक्षणाधिकारी (माध्य.) अशोक कडूस, शिक्षणाधिकारी (प्राथ.)भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे आदी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपूर्ण जिल्ह्यातील विद्यालय व त्यांचे प्रतिनिधी यांच्या मधून आदर्श विद्यालय व विद्या विभुषण पुरस्कार २०२४ पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यामध्ये ब्राह्मणी येथील नामांकित स्व.विलास बानकर इंग्लिश मीडियम स्कूल च्या प्रा सौ.अश्विनी प्रकाश बानकर यांना’आदर्श विद्यालय’ साठी* तर आदर्श शिक्षकांसाठी असलेल्या ‘विद्या विभूषण पुरस्कार’ शाळेच्या शिक्षिका सौ.मुग्धा राहुल जोर्वेकर यांना मिळाला. पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्यालयाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!