दिशाशक्ती प्रतिनिधी / नितीन पाटूळे : वैजापूर येथील साने गुरुजी जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या पंधराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने 21 शिक्षकांना उपक्रमशील शिक्षक म्हणून संसदपटू कार्यसम्राट आमदार श्री रमेश पाटील बोरणारे सर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष श्रीम. शिल्पाताई दिनेशभाऊ परदेशी तसेच मा. सभापती बाबासाहेब पाटील जगताप, दीपक भाऊ राजपूत मा. जि प सदस्य मनाजी पाटील मिसाळ मा. जि प सदस्य, साबेर भाई मा. उपनगराध्यक्ष, नितीन नलवडे पोलीस उपनिरीक्षक वैजापूर, मनीष दिवेकर साहेब विस्ताराधिकारी, बी के म्हस्के साहेब विस्ताराधिकारी,यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन श्याम भाऊ राजपूत यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय थोरात यांनी केले, आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव शिवाजी पाटील डुकरे यांनी केले. सुरेश भुजाडे यांनी आपल्या सुरेल आवाजात भावगीते व अभंगवाणी सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच काशिनाथ गावित सर यांनी सुंदर रांगोळी रेखाटून कार्यक्रमाची उंची वाढवली.
कार्यक्रमासाठी व्हा.चेअरमन के डी मगर,लक्ष्मिकांत धाडबळे,दादासाहेब पटारे, अनिल पैठणपगारे,संजीव जाधव, सतीश जाधव, फारुख शेख,संतोष भाबड, संतोष गोमलाडू, यशवंत मगर, कुंदा काळे, अर्चना जगधने, गंगाराम घुमरे, नामदेव चोरे, उद्धव शेळके, नितीन सातपुते, सुनील धाटबळे, वरून शेळके, विजय वाळके, विठ्ठल शेळके,वसंत निलेवाड यांनी सहकार्य केले.
Leave a reply