राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील कनगर येथे शेतीच्या वादातून एका कुटुंबांवर प्राणघातक हल्ला केल्याने सात जण गंभीर जखमी झाले. ही घटना काल दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. कनगर येथील संगीता राधाकिसन लाहंडे, पुष्पा बाळासाहेब लाहुंडे, अनिता विजय लाहुंडे, रेखा श्रीराम लाहुंडे, राधाकिसन नारायण लाडूंडे, बाळासाहेब नारायण लाहुंडे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
राहुरी तालुक्यातील कनगर येथे जुन्या शेत जमिनीच्या वादातून लाहुंडे कुटुंबावर गावातील एकाने बाहेरील गावातून १० ते १५ जणांना बोलवून घेत सदर कुटुंबातील महिलांशी झटापट करून त्या महिलांवर धारदार शस्त्राने वार केले. या घटनेत चार महिला गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. तर त्याच कुटुंबातील दोघांना बेदम मारहाण केली. त्यानंतर गावातील लोक जमा होताच तेथून त्या टोळक्याने पळ काढला. ही घटना घडल्यानंतर यातील जखमींवर राहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते. या शेत जमीन वादातून रविवार दि. ८ सप्टेंबर रोजी या घटनेतील मुख्य अरोपीच्या विरोधात राहुरी पोलिसांत अॅट्रोसीटीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समजते.
या गोष्टीचा राग धरून कालची घटना घडल्याची चर्चा उपस्थित नातेवाईकांमध्ये सुरू होती. सदर घटना घडल्यानंतर आरोपी विरोधात फिर्याद देण्यासाठी लाहुंडे कुटुंबाच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात मोठी गर्दी करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
कणगरमध्ये शेतजमिनीच्या वादातून एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला हल्ल्यात सातजण जखमी, तीन महिला गंभीर जखमी

0Share
Leave a reply