Disha Shakti

सामाजिक

अप्पर जिल्हाधीकारी बाळासाहेब कोळेकर यांच्याहस्ते गोटुंबे आखाडा येथील मोरया मित्रमंडळाची गणेश आरती संपन्न

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / रमेश खेमनर : राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथे मोरया मित्र मंडळाची गणेशाची चौथ्या दिवसाची सायंकाळची आरती शिर्डी येथील अप्पर जिल्हाधीकारी बाळासाहेब कोळेकर यांच्याहस्ते सपत्नीक आरती पार पडली मोरया मित्र मंडळाच्यावतीने व हभप आण्णासाहेब बाचकर यांनी कोळेकर साहेब यांना गणेश आरती व गोटुंबे आखाडा येथील गायरान व गावठाण विषयी चर्चेसाठी आमंत्रित केले असता अप्पर जिल्हाधीकारी बाळासाहेब कोळेकर व त्यांच्या पत्नी वर्षाताई कोळेकर यांच्यासह राहुरीच्या नायब तहसीलदार संध्या दळवी, राहुरी खुर्दचे तलाठी तुषार काळे हे उपस्थित होते.

वरील सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गणेश आरती संपन्न झाली प्रथमतः वरील सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नेते हभप आण्णासाहेब बाचकर यांनी गोटुंबे आखाडा येथील गायरान व गावठाण विषयी चर्चेला सुरवात केली व या गावातील ग्रामस्थांच्या जागा नावावर करण्यासाठी आपल्या स्तरावरून योग्य दखल घेऊन प्रयत्न करण्याची मागणी केली.

यावेळी माजी उपसरपंच उमेश बाचकर, अंबादास साखरे, काका गडधे, मुकींदा शिंदे, प्रकाश वाघ, अंकुश दवणे, रामदास बाचकर, संदीप सुसे, बिलाल शेख, आदिनाथ महाराज दवणे, अमोल बाचकर, सचिन खेमनर, आकाश डहाळे, अक्षय डहाळे, महेंद्र मराठे, चैतन्य सूसे, राजन सूसे, अजिंक्य आदमाने यांच्यासह अनेक ग्रामस्थ व मोरया मित्र मंडळाचे तरुण उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!