दौंड प्रतिनिधी / सुधीर लोखंडे : “आली, आली गौराई, सोन्या रूपाच्या पावलान….. आली आली गौराई, धनधान्याच्या पावलान ….” अशी पारंपारिक गीते गात महिलांनी मंगळवारी गणराया बरोबर माहेरपणासाठी येणाऱ्या गौरीचे मंगलमय वातावरणात स्वागत केले. पारंपारिक पद्धतीने महालक्ष्मीचा सन्मान करण्यात आला बुधवारी गौरीचे महापूजन होणार असून त्यांना नैवेद्य दाखवण्यात येईल. जयत, तयारी करून ज्येष्ठा आणि कनिष्ठांचा यथोचित्त सन्मान करणे हा महिलांसाठी जिव्हाळ्याचा विषय ठरतो . घराची स्वच्छता करण्यापासून ते त्यांच्यासाठी वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांचे मेजवानी व रेखीव कलाकुसरीच्या दागिन्यांची भेट देऊन महिला महालक्ष्मीचे स्वागत करतात ,शेवटच्या क्षणापर्यंत महिलांचे सजावटीचे काम सुरू असते . गृहिणी व नोकरदार व स्त्रिया रात्री जागून तयारी करतात यंदाही घराघरात महालक्ष्मीच्या स्वागतासाठी नाविन्यपूर्ण साहित्याची सजावट करण्यात आली आहे, काही घरांमध्ये पारंपारिक पद्धतीने शाडूच्या, पितळेच्या तर काय ठिकाणी सात खड्यांच्या रूपात गौरीचे आगमन झाले.
नदीवर किंवा पानवट्यावर जाऊन महिलांनी सात कडे आणले . बाजारपेठ गौरी गणपतीच्या आगमनाने फुलून गेली होती बाजारपेठेत गौरीच्या दागिन्यांचे असंख्य प्रकार उपलब्ध होते महिलांनी यंदाही गौरीसाठी नवीन दागिने खरेदी करण्यावर भर दिला, आकर्षक रोषणाई फराळांचे आरास सजवलेल्या घरांमध्ये साड्या दागिने परिधान करून दाखल झालेल्या गौराईंना वातावरणात चैतन्य रंग भरणे गौराईंचे घराघरांमध्ये आगमन झाल्यानंतर हळदीच्या ठशांनी चंदनाचे बोट लावलेल्या पावलांचे ठसे घरभर उमटवले ,बुधवारी त्यांचे महापूजन केले जाणार आहे.
Leave a reply