Disha Shakti

Uncategorized

कृषि परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे यांची महात्मा फुले कृषि विद्यापीठास भेट

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : पुणे येथील महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक श्री. रावसाहेब भागडे यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठाला भेट दिली. यावेळी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, कुलसचिव श्री. अरुण आनंदकर, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के व विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे उपस्थित होते. याप्रसंगी कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन व विस्तार कार्याची माहिती महासंचालकांना दिली. यावेळी विद्यापीठातील रिक्त जागांबद्दलही चर्चा करण्यात आली तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी विद्यापीठातून पाठविल्या गेलेल्या प्रस्तावांबाबत त्यांनी माहिती घेतली. त्याचप्रमाणे या वर्षाची कृषि पदवीची प्रवेश परीक्षा याबाबत त्यांनी माहिती घेतली. विद्यापीठाचा सेंद्रिय संशोधन प्रकल्प, बांबू प्रकल्प व पुणे कृषि महाविद्यालयातील देशी गाय संशोधन व विकास प्रकल्पाबाबत त्यांनी माहिती घेतली.

यावेळी महासंचालकांनी विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यातील आतापर्यंतच्या भरीव योगदानाबद्दल तसेच विद्यापीठ विविध पिकातील बीजोत्पादनाच्या करीत असलेल्या उच्चांकाबद्दल समाधान व्यक्त केले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!