विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : बेकायदा गर्भपात केल्याप्रकरणी नेवासा फाटा येथील एका डॉक्टरविरोधात एमटीपी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. प्राची कंठाळी- जाधव असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की नेवासा ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बागवान मोहसीन महमंदहुसेन (वय ३७) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की दि. २ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास स्टेट नोडल ऑफिसर डॉ. श्रीमती ढवळे यांनी अचानक नेवासा फाटा येथील गंभौकूर हॉस्पिटलला भेट दिली. तेथे त्यांना गर्भपात करण्यासाठी वापरण्यात येणारे ओहम फॉरसेफ व क्युरेट असे साहीत्य अढळून आले. तसेच हॉस्पिटल एमटीपी अॅक्ट १९७१ नुसार नोंदनीकृत वा मान्यताप्राप्त नव्हते.
तेथील डॉ. प्राची कंठाळी-जाधव या एमटीपी करण्यासाठी सक्षम नव्हत्या. त्यानंतर डॉ. ढवळे यांनी जप्त केलेले सर्व साहित्य डॉ. बागवान यांच्या ताब्यात दिले. त्यानंतर रविवार दि. ८ सप्टेंबर रोजी डॉ. बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉ. कंठाळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेकायदा गर्भपात केल्याप्रकरणी नेवासा फाटा येथील एका डॉक्टरविरोधात एमटीपी अँक्टनुसार गुन्हा दाखल

0Share
Leave a reply