Disha Shakti

सामाजिक

पंढरपूर येथील धनगर समाजाच्या उपोषणा कडे धनगर नेत्यांनीच फिरविली पाठ.

Spread the love

दिशाशक्ती प्रतिनिधी / भारत कवितके : सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 पासून पंढरपूर येथील टिळक स्मारक मैदानात धनगर समाजाचे समाज बांधव एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता उपोषणाला बसले आहेत परंतु पहिल्या दिवसापासून आज तिसऱ्या दिवसांपर्यंत एक ही धनगर समाजाचा नेता या ठिकाणी आलेला नसल्याने धनगर समाज बांधव नेत्यांच्या या वागणूकीवर नाराज असल्याचे चित्र उपोषण स्थळी दिसून येते.उपोषणाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राच्या विविध भागातून धनगर समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांचे कार्यकर्ते, धनगर समाजाचे मान्यवर मार्गदर्शक,व इतर कार्यकर्ते या राज्य व्यापी आमरण उपोषणाच्या पहिल्या दिवशी झालेल्या सर्व कार्यक्रमात उपस्थित होते.ना नेता ना पक्ष आरक्षण अमंलबजावणी हेच लक्ष, जुने च काम नव्या दमाने करायचे या उद्देशाने जरी सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांनी आमरण सुरू केले असले तरी आजी माजी नेत्यांनी आपण एक समाज बांधव या नात्याने तरी उपस्थित राहयला हवे होते.अशी चर्चा उपोषण स्थळी होताना दिसत होती. पहिल्या दिवशी अभ्यास पूर्ण सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य कार्यकर्ते विजय गोफणे यांनी कार्याचा आढावा घेतला तर पांडुरंग मेरगळ यांनी भावनिक आवाहन करुन सामाजिक कार्यकर्ता यांना उर्जा दिली.पांडुरंग मेरगळ यांच्या भाषणाने सर्व उपस्थित समाज बांधव गहिवरून गेले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!