Disha Shakti

सामाजिक

शाळा – कॉलेज बाहेरील रोड रोमिओंचा बंदोबस्त करणार : समीर बारवकर ढोकेश्वर विद्यालयामध्ये पोलीस खाते व विद्यार्थी समुपदेशन

Spread the love

पारनेर प्रतिनिधी /वसंत रांधवण : तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील श्री ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये पोलीस खाते व विद्यार्थी समुदेशन व्हावे यासाठी पारनेरचे पोलीस निरीक्षक समीरजी बारवकर विद्यार्थ्याना मोलाचे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांनी स्वभाविक जीवना मध्ये कशा प्रकारे यश प्राप्त करावे या विषयी सांगितले. बारवकर साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, टाकळीढोकेश्वर बसस्थानक शाळा कॉलेज तसेच शिकवणी वर्गाबाहेर तसेच विद्यालयाच्या परिसरात विनाकारण विद्यार्थिनींना त्रस्त देणाऱ्या रोड रोमिओंचा तसेच टवाळखोरांचा बंदोबस्त आता पारनेर पोलिस स्टेशन मार्फत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून सावध राहावे मोबाईलचा अतिवापर टाळावा तसेच मेसेज फॉरवर्ड करताना विचारपूर्वक करावे. येत्या आगामी काळामध्ये तुम्ही विद्यार्थी देशाचे भविष्य असून तुमच्याकडून खूप आशा आहेत.

यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक शिवाजी सावंत सर यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पोलीस हे. कॉ. गायकवाड, पोलीस हे. कॉ. मोढवे पो. कॉन्स्टेबल मगर साहेब, पो.कॉ.रवींद्र साठे साहेब, पो.कॉ. खेमनर साहेब यांच्या सह पारनेर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यावेळी हजर होते. ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक शिवाजी सावंत, शेळके सर, अतुल सैद,सोबल सर,गांगड सर, हिंगडे सर, खिलारी मॅडम, सुनील झावरे , यांच्यासह सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते . या कार्यक्रमाच्या शेवटी हींगडे सर यांनी उपस्थितांचे व विद्यार्थ्यांचे आभार मानले.

 विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना कोणत्याही प्रकारचा त्रास जर कोणी देत असेल तर त्यांनी त्यांची तक्रार पारनेर पोलीस स्टेशन तसेच हेल्पलाइन नंबर ११२ तसेच आपली तक्रार विद्यालयातील तक्रार पेटीमध्ये टाकावी तक्रार देणाऱ्या विद्यार्थ्यांनीचे नाव हे गुप्त राहिल तसेच ढोकेश्वर विद्यालयाच्या आवारामध्ये शाळा भरण्यापूर्वी किंवा शाळा सुटल्यानंतर रोड रोमिओंकडून, बाहेरील मुलांकडून होणारा त्रास याचा बंदोबस्त पारनेर पोलिस स्टेशन मार्फत करणार

— समीर बारवकर, पोलिस निरीक्षक पारनेर


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!