दिशाशक्ती न्यूज नेटवर्क पंढरपूर / भारत कवितके : सोमवार दिनांक 9 सप्टेंबर पासून पंढरपूर येथील टिळक स्मारक मैदानात एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता धनगर समाज बांधव राज्य व्यापी आमरण उपोषणाला बसले आहेत.त्यापैकी दिपक बोराडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.धनगर समाजाचा वाघ समजले जाणारे दिपक बोराडे खूपच धडाडीचे कार्यकर्ते आहेत.धनगर समाजाला अशा लढवय्या कार्यकर्ता ची नितांत गरज आहे.दिपक बोराडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे उपोषण स्थळी असलेले समाज बांधव हवालदिल झाले आहेत.अनेकांच्या अश्रू चा बांध फुटला.तेथील उपस्थित सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांचे कार्यकर्ते आपल्या अश्रूं भरलेल्या डोळ्यांनी महाराष्ट्र राज्यातील तमाम धनगर समाज बांधवांनी पंढरपूर ला उपोषण स्थळी येण्याचे आवाहन करीत आहेत.
तीन दिवस होऊनही शासनाने या उपोषणाची साधी विचारपूस ही केली नाही, जाणीव पूर्वक धनगर समाजाच्या राज्य व्यापी आमरण उपोषणा कडे दुर्लक्ष केले,जर उपोषण कर्त्या ला काही कमी जास्त झाले तर त्याची जबाबदारी शासनाची असेल, धनगर समाज बांधव पूर्ण महाराष्ट्र भर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. प्रकृती चिंताजनक असलेले दिपक बोराडे यांचे कडे नेतृत्व, वक्तृत्व,गुण आहेत.शासनाने या धनगर समाजाच्या राज्य व्यापी आमरण उपोषणाकडे लक्ष देऊन त्यांच्या संविधानात समाविष्ट असलेले एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी, धनगर समाज नव्याने आरक्षण मागत नाही.
Leave a reply