Disha Shakti

क्रीडा / खेळ

कोतुळ पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश

Spread the love

दिशाशक्ती न्यूज नेटवर्क अकोले  : अहमदनगर जिल्हा शालेय विभागाच्या वतीने तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये अकोले तालुक्यातील ४० संघ सहभागी झाले होते या मध्ये कोतुळ पब्लिक स्कूल अँड ज्युनि. कॉलेज, कोतुळ या विद्यालयातील १४ वर्षाखालील मुलींच्या संघाने फायनल पर्यत धडक मारत अंतिम सामन्यात शानदार कामगिरी करत अकोले तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळविला. ही स्पर्धा शांततेच्या व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

या विजयी संघाचे स्व.भाऊ दाजी पाटील देशमुख ग्रा.वि. प्रतिष्ठान,संस्थेचे सचिव श्री. रवींद्र देशमुख, अध्यक्ष श्री. भाऊसाहेब देशमुख यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेचे क्रीडा शिक्षक श्री.अनिकेत देशमुख यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.डि.एम वाळकोळी यांनी विशेष सहकार्य केले व श्री माळी सर व श्री. गायकर सर यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभल्याने आम्हाला हे यश मिळाले असे विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!