श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : दिनांक 23/01/2024 रोजी फिर्यादी ज्योती शिवाजी वेताळ, वय 48 वर्षे, धंदा- गृहीणी, रा. ब्राम्हणगाव वेताळ ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर या, त्यांचे पतीसोबत दिनांक 22/01/2024 रोजी सांयकाळी 07/00 वा.चे सुमारास त्यांचे मोटारसायकलवर आर.टी.ओ. ऑफीसकडुन शिरसगांव जाणारे रोडने जात असतांना सोमनाथ शिंदे यांचे विटभट्टीजवळ आले असता त्यांच्या पाठीमागुन एका विना नंबरच्या काळया रंगाच्या प्लसर मोटारसायकलवर दोन अनोळखी इसम येवुन माझ्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे सोन्याचे गठंण बळजबरीने ओढुन तोडुन घेवुन गेले वगैरेच्या तक्रारीवरुन श्रीरामपूर शहर पो.स्टे गुरनं. 61/2024 भादंवि कलम 392,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा गुन्हा दाखल होताच मा. पोनि.नितीन देशमुख सो.यांनी तपास पथकास गेले मालाचा, सदर गाडीचा व अनोळखी आरोपीतांचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथक तात्काळ घटनास्थळी जावुन पाहणी केली व गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता सदरचा गुन्हा हा सायंकाळी व रहदारी नसलेल्या रोडवर घडलेला असल्याने काहीएक उपयुक्त माहिती मिळाली नाही. त्यामुळे वेळोवेळी सदर गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेत असतांना दिनांक 31/08/2024 रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा आरोपी नामे 1) अजय संजय पंडित, वय 20 वर्षे, रा. निपाणी वडगाव ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर. 2) राहुल मानिक आमराव, वय 26 वर्षे, रा. निपाणी वडगाव ता.श्रीरामपूर जि.अहमदनगर, यांनी केला असल्याची माहिती मिळाल्याने मा.पोनि.नितीन देशमुख सो. यांचे आदेशाने तपास पथकाच्या दोन टिम बनवण्यात आल्या व एकाच वेळी दोघांच्या राहते घरी जावुन शोध घेतला असता यातील आरोपी क्रं. 1) अजय संजय पंडित, वय 20 वर्षे, हा मिळुन आल्याने त्याच्याकडे नमुद गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा आरोपी क्र. 02 राहुल माणिक आमराव, वय 26 वर्षे याच्यासह मिळुन केला असल्याची कबुली दिली व तो सध्या राहते घरी नसुन महालगाव ता. वैजापुर जि.छ.संभाजीनगर येथे गेला असल्याचे सांगितल्याने तात्काळ दुसरी टिम महालगाव ता. वैजापुर येथे रवाना होवुन सदर आरोपीस महालगाव येथुन शिताफीने ताब्यात घेवनु श्रीरामपूर येथे आणुन दोघांना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली व त्यांच्याकडुन खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
1)47,000/- रु. किंमतीचा 9.600 ग्रॅम वजनाचा सोन्याचा गंठणचा तुटलेला पट्टा जुवाकिंअं. (आरोपी क्रं.1अजय संजय पंडित यांच्याकडुन जप्त करण्यात आलेला.)
2)80,000/- रु. किंमतीचे 2.400 ग्रॅम वजनाचा सोन्याचा गंठणचा तुटलेला पट्टा व पेडल जुवाकिंअं. (आरोपी क्रं. 02 राहुल मानिक आमराव यांचे ताब्यातुन जप्त करण्यात आलेले जुवाकिंअ.)
3)95,000/- रु. किं. ची विना नंबरची काळया निळया रंगाची बजाज प्लसर 125 मोटारसायकल तिचा चेसी नं. MD2B72BX9RCL75997 बेसा असलेली सदरचा गुन्हा करतांना वापरलेली जुवाकिंअ. (आरोपी क्रं. 1 अजय पंडित यांच्याकडुन जप्त करण्यात आलेली. एम.आय.डी.सी. वाळुज पोलीस स्टेशन जि.छ. संभाजीनगर गुरनं. 596/2024 प्रमाणे दाखल गुन्हयातील चोरी केलेली.) 2,22,000/- एकुण किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरील वर्णनाचा व किंमतीचा मुद्देमाल सदर आरोपीतांकडुन जप्त करुन सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणला आहे. तसेच सदर गुन्हयातील अटक आरोपीतांकडे इतर ठिकाणी गुन्हे केले आहेत का याबाबत सखोल तपास केला असता यातील अटक आरोपी आरोपी क्रं.1) अजय संजय पंडित, वय 20 वर्षे, याने एम.आय.डी.सी. वाळुज पोलीस स्टेशन हद्दितुन एक काळया निळ्या रंगाची बजाज प्लसर 125 मोटारसायकल तिचा चेसी नं. MD2B72BX9RCL75997 असा असलेली चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदरबाबत एम. आय. डी.सी. वाळुज पोलीस स्टेशन येथे संर्पक केला असता सदर मोटारसायकलबाबत गुरनं. 596/2024 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली असुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
तसेच आरोपी क्रं.02 राहुल माणिक आमराव, वय 26 वर्षे यांने त्याचा साथीदार नामे सागर केदारी, रा. साजारापूर जि.छ. संभाजीनगर यांच्यासोबत दिनांक 18/08/2024 रोजी दुपारी 03/15 वा. सुमारास सहयाद्री हॉस्पीटल जवळ, राज हार्डवेअर समोर जालना हायवेवर जि.छ.संभाजीनगर येथे चेन स्नॅचिंग केली असल्याची कबुली दिली आहे. तरी सदरबाबत सबंधीत मुकुंदवाडी पोलीस स्टेशन येथे संर्पक केला असता सदर चेन स्नॅचिंगबाबत मुकुंदवाडी पोलीस स्टेशन गुरनं. 325/2024 बी.एन.एस. कलम 309 (4) प्रमाणे दिनांक 18/08/2024 रोजी गुन्हा नोंद असल्याची माहिती मिळाली असुन सदरचा गुन्हा हा तात्काळ उघडकीस आणला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे साहेब तसेच मा.उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, डॉ.बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख, यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोना/ रघुवीर कारखेले, पोकॉ/ राहुल नरवडे, पोकॉ/ गौतम लगड, पोकॉ/ रमिझराजा अत्तार, पोकॉ/ संभाजी खरात, पोकॉ/अजित पटारे, पोकॉ/रामेश्वर तारडे, पोकॉ/ आजीनाथ आंधळे, मपोकॉ/ मिरा सरग तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोना/संतोष दरेकर, पोना/ सचिन धनाड, पोना/वेताळ यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख साो. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके हे करीत आहेत.
सोन्याचे गठंण चोरीतील आरोपीतांना अटक करुन तीन तोळे वजनाचे गठंणसह 2,22,000/- रु. किं.चा मुद्देमाल जप्त, श्रीरामपूर शहर पोलीसांची कामगिरी

0Share
Leave a reply